कोरोना विषाणूबद्दल माहिती: Coronavirus Outbreak दरम्यान भाज्या, फळं सुरक्षितपणे कशा हाताळाल? साबण, डिटरजंटने स्वच्छ करण्याचा पर्याय 'या' कारणांसाठी तात्काळ थांबवा!

फळं, भाज्या साबण, डिटरजंटने धुणं कसे ठरेल घातक? जाणून घ्या कोरोनाच्या संकटात कशी हाताळाल फळं आणि भाज्या

Safe ways to wash Fruits and Vegetables | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्यसंकटाचा मुकाबला करण्यासाठी सध्या निम्म जग लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोना व्हायरस हा छुपा वार करत असल्याने संपर्कातून झपाट्याने फैलावत असणार्‍या कोव्हिड 19 ची भीती सर्वसामान्यांच्या मनात अशामध्ये संचारबंदीचे नियम असल्याने जीवनवश्यक वस्तूंची खरेदी वगळता कुणालाही बाहेर पडता येत नाही. मग जाणून घ्या या कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात नेमकी अन्नपदार्थांची सुरक्षित खरेदी, देवाण-घेवाण कशी करायची? प्लॅस्टिक, कार्डबोर्ड, काच अशा विविध पृष्ठभागांवर कोरोना व्हायरस टिकून राहण्याचा काळ वेगवेगळा आहे.

भाजी, फळं ही बाहेरून विकत घेताना पॅक करून घेतली असतील तर त्याच्यामाध्यमातून कोरोनाचा घरात शिरकाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी विशिष्ट काळजी घेणं गरजेचे आहे. अनेकांना भाज्या, फळं बाजारातून आणली तर ती आपण जसे हात साबण लावून धुतो तशी धुवावीत का? असा प्रश्न पडतो. पण हा पर्याय तुमच्या जीवावर बेतू शकतो.

फळं, भाज्या साबण, डिटरजंटने धुणं कसे ठरेल घातक?

फळं, भाज्या साबणाने धुतल्यास त्याचे काही अंश त्यावर राहण्याची शक्यता आहे. असे पदार्थ पोटात गेल्यास डायरिया, उलट्यांचा त्रास होऊ शकतो. अन्ननलिकेच्या माध्यतून पदार्थासोबत साबण पोटात गेल्याने पचनसंस्थेचे काम बिघडू शकते. मळमळ, अस्वस्थता ही कोव्हिड 19 च्या लक्षणांप्रमाणेच असल्याने तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यास कळत नकळत कोरोनाचा संसर्ग होण्याचीही शक्यता वाढते. The U.S. Department of Agriculture ने देखील अशाप्रकारे डिटरजंट किंवा साबणाचा वापर करून भाज्या, फळं धुणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

भाज्या, फळं सुरक्षित हाताळण्याची पद्धत?

भाज्या, फळं आणल्यानंतर थेट फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यांना काही काळ बाहेर ठेवून वापरताना वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास कोमट पाण्यामध्ये ठेवून नंतर भाज्या चिरा आणि वेगळ्या ठेवा. व्यवस्थित शिजवून अन्न खाल्ल्यास ते सुरक्षित आहे. दूधाच्या पिशव्यादेखील वापरण्यापूर्वी वाहत्या पाण्याखाली धुवून घ्या. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. फळं देखील न धुता खाऊ नका. यामुळे कोरोना व्हायरससोबतच इतर विषाणूंपासूनही तुमचा बचाव होण्यास मदत होईल. जेवण बनवण्यापूर्वी आणि नंतरही हात  स्वच्छ धुवा.  Lockdown काळात भाज्या, फळे, दूध खराब न होऊ देता अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी 'या' किचन टिप्स नक्की वाचा.  

सध्या जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्याने सामान्यांच्या मनात अनेक शंकांचं काहूर माजलं आहे. अशामध्ये सोशल मीडियामध्ये फेक न्यूज, अफवांना पेव आल्याने कोणत्याही सल्ल्यांवर थेट विश्वास ठेवू नका. मनात शंका आल्यास सरकारी नियंत्रणकक्षाची बोलून त्यांचं निरसन करून घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif