Covid-19 Vaccine Update: Sputnik V लस कोरोना व्हायरस वर 92% परिणामकारक; रशियाचा दावा

रशियाची कोविड-19 वरील Sputnik V ही लस दिलेल्या स्वयंसेवकाच्या रिपोर्टनुसार, लस 92% परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.

Sputnik V Covid-19 Vaccine (Photo Credits: Yalç?n Sonat / 123rf)

कोविड-19 लसीबद्दल (Covid-19 Vaccine) रशियातून (Russia) सकारात्मक बातमी समोर येत आहे. रशियाची कोविड-19 वरील Sputnik V ही लस दिलेल्या स्वयंसेवकाच्या रिपोर्टनुसार, लस 92% परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती रशियाच्या Sovereign Wealth Fund यांनी बुधवारी दिली आहे. रॉयटर्स (Reuters) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, Sputnik V ही लस कोविड-19 वर 92% परिणामकारक आहे. मॉस्को (Moscow) मधील लसीच्या शेवटच्या टप्प्यातील परिणांमातून हे निष्कर्ष हाती आले आहेत.

परंतु, चाचणीच्या डिझाईन आणि प्रोटोकॉलबद्दलचे ज्ञान कोणतेही स्पष्टीकरण देण्यास पुरेसे नाही. त्यामुळे बुधवारी जारी केलेल्या निकालांवरुन निष्कर्षावर पोहचता येणार नसल्याचे स्वतंत्र तज्ञांनी सांगितले. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील (Imperial College) इम्युनोलॉजीचे प्राध्यापक (Professor of Immunology) डॅनी ऑल्टमॅन (Danny Altmann) यांनी रॉयटर्सला सांगितले की, या निकालांना नकार देण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. परंतु, खूपच कमी डेटा उपलब्ध असल्याने यावर टिप्पणी देणे खूप कठीण आहे. (Corona Vaccine: Pfizer ने विकसित केलेली कोरोना लस 90 टक्के परिणामकारक; तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत स्पष्ट)

Sputnik V ही लस गमलेया संशोधन संस्था आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केली आहे. यापूर्वी सोमवारी Pfizer Inc आणि BioNTech SE यांनी त्यांच्या लसी कोरोना व्हायरसवर 90% परिणामकारक असल्याची घोषणा केली होती. (Pfizer COVID-19 Vaccine: कोविड 19 वरील लस कधी येणार? जाणून घ्या अमेरिकेच्या Pfizer Inc आणि BioNTech SE कंपनीच्या लसीबद्दल खास गोष्टी!)

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून जगातील अनेक देश कोरोना व्हायरस संकटामुळे त्रस्त आहेत. कोविड-19 चा संकटामुळे बेरोजगारी, पगारकपात, अर्थव्यवस्था डळमळीत होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. तर सामान्य नागरिकांसह सर्वांचे लक्ष लसीच्या विकासाकडे लागले आहे. या दिलासादायक माहितीनंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.