Surya Grahan 2019: ग्रहणात गर्भवती महिलांनी कशी घ्यावी काळजी
यंदाचे हे सूर्यग्रहण ज्योतिषांच्या माहितीनुसार अत्यंत खास असणार आहे. या ग्र्हण कालावधी दरम्यान गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यायची असते.
2019 वर्षाच्या सरते शेवटी या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिसणार आहे. 26 डिसेंबरला हे ग्रहण भारतात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण पूर्ण नसून खंडग्रास स्वरूपातील असेल जे वलयाकार आकारात पाहयला मिळणार आहे, देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटक (Karnatak), केरळ (Kerala) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये हे ग्रहण स्पष्टपणे दिसणार असून महाराष्ट्रात औरंगाबाद (Aurangabad) येथून अंशतः ग्रहण पजहता येणार आहे याशिवाय, उर्वरित देशात सूर्यग्रहण अर्धवट दिसेल. यंदाचे हे सूर्यग्रहण ज्योतिषांच्या माहितीनुसार अत्यंत खास असणार आहे. या ग्र्हण कालावधी दरम्यान गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यायची असते.
काय आहे ग्रहण कालावधी:
सूर्यग्रहणाचे सुतक ग्रहणाहून 12 तास आधी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटापासून सुरू होईल, जे 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 57 मिनिटावर संपेल. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. असे सांगितले जात आहे की हे आंशिक सूर्यग्रहण सकाळी 8.17 मिनिटांनी सुरू होईल आणि 10:57 वाजता समाप्त होईल.
ग्रहणाच्या सुतक कालावधी पासून गरोदर महिलांनी पुढे दिलेल्या नियम पाळावेत
घराबाहेर पडू नका:
ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये. कारण ग्रहणाच्या वेध काळात चंद्राची किरणे गर्भवती स्त्रियांच्या अंगावर पडणे बाळासाठी धोकादायक मानले जाते. यामुळे ओठ कापणे, विचित्र जन्मखुणा बाळाच्या अंगावर येणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी घरातच थांबणे योग्य ठरेल.
ग्रहण पाहू नये:
उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. मात्र हा नियम गर्भवती स्त्रियांनाच नाही तर सर्वांना लागू होतो.
विशिष्ट पदार्थ खाणे टाळा:
आंबवलेले, तिखट आणि तेलकट पदार्थ ग्रहण काळात खाणे टाळा. त्याचबरोबर मांसाहार देखील टाळणे योग्य ठरेल.
ध्यानधारणा आणि मंत्रोच्चार:
ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी काही काम करु नये, असे मानले जाते. त्यामुळे या काळात ध्यान करणे किंवा एखादे मंत्रपठण करणे फायदेशीर ठरेल.
शरीराची स्वच्छता राखा:
गर्भवती स्त्रियांनी ग्रहणकाळात दोनदा अंघोळ करावी. ग्रहण सुरु होण्यापूर्वी आणि ग्रहण संपल्यानंतर. त्यामुळे ग्रहणकाळातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
गरोदर महिलांनी हे नियम पाळण्याबाबत तसे कोणतेही शास्त्रीय कारण समोर आलेले नाही. मात्र गर्भाच्या काळजीपोटी हे नियम पाळण्यास काही हरकत नाही.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही. )