सावधान! तुमच्या पार्क केलेल्या गाड्यांमध्ये असणारा हा विषारी वायू ठरु शकतो जीवघेणा, काय घ्याल खबरदारी
हा इतका घातक आहे की त्याचे आपल्या शरीरावर होणारे विपरित परिणाम ऐकून तुम्हालाही घाम फुटेल. काय घ्याल खबरदारी
जग हायटेक बनत चालले असताना माणसांच्या गरजा देखील हायटेक बनत चालल्या आहेत. पूर्वी पायी प्रवास करणा-या लोकांची जागा आता आलिशान गाड्यांमधून प्रवास करणा-या गाड्यांनी घेतली आहे. आणि गाड्या म्हटलं की, गाड्यांमधील एसी ही ओघाओघाने आलीच. उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गाडीतून प्रवास करणारे लोक ब-याचदा गाड्यांमधील एसीचा वापर करतात. त्यामुळे दारात उभी असलेल्या गाडीत बसल्या बसल्या सर्वप्रथम एसी चालू करणे अशीच ब-याच जणांना सवय असते. मात्र असे केल्यास ते तुमच्या जीवावरही बेतू शकते. ऐकून धक्का बसला ना! पण हे खरे आहे. गाडी जेव्हा पूर्णपणे बंद असते म्हणजेच तिच्या खिडक्या,दरवाजे बंद असतात तेव्हा गाडीत बेन्झीन नावाचा विषारी वायू तयार होत असतो. हा इतका घातक आहे की त्याचे आपल्या शरीरावर होणारे विपरित परिणाम ऐकून तुम्हालाही घाम फुटेल. जाणून घ्या याचे गंभीर परिणाम:
◆खिडक्या बंद करून पार्क केलेल्या कार मध्ये ४०० ते ८०० मिलीग्राम बेन्झीन तयार होतो, हा वायू स्वीकृत स्तरापेक्षा ८ पट जास्त आहे. जर बाहेरचे तापमान ३० अंश सेन्टीग्रेड पेक्षा जास्त असेल तर बेन्झीनचा स्तर २०००-४००० मिलीग्राम होतो, म्हणजेच स्वीकृत स्तरापेक्षा ४० पट जास्त होतो.
◆ पार्किंग गाड्यांमध्ये बेन्झीन हा एक नैसर्गिक विषारी वायू तयार होतो. ज्यामुळे तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता असते. जेव्हा खिडक्या बंद असलेली कार उन्हात उभी असते तेव्हा गरम हवेमुळे कारमध्ये बेन्झीन वायु तयार होतो. याचे कारण कार चे डॅशबोर्ड , सीट , ए सी डक्ट असे बरेच भाग प्लास्टिकचे बनले आहे आणि हे प्लास्टिक गरम हवेमध्ये बेन्झीन वायू तयार करतात.
◆ जो व्यक्ती खिडक्या बंद असलेल्या कारमध्ये बसतो तो आपल्या श्वासाद्वारे जास्तीत जास्त बेन्झीन शरीरात घेतो. हा वायु व्यक्तीच्या मूत्रपिंड, यकृत,आणि हाडांमध्ये जातो आणि मग तो शरीरातून बाहेर काढणे कठीण जाते.
◆ बेन्झीन मुळे रक्तक्षय तसेच पांढऱ्या पेशी कमी होऊ शकतात. गर्भवती महिलेचा गर्भपात होऊ शकतो.
घ्यावयाची खबरदारी:
कार मध्ये बसल्यानंतर जेव्हा तुम्ही लगेचच ए सी चालू करता तेव्हा तो थंड हवा न फेकता गरम हवा फेकतो. या गरम हवेमध्ये बेन्झीन असतो. यावर सोपा उपाय म्हणजे कारमध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम कारच्या सर्व खिडक्या उघडा. त्यामुळे कार मधली बेन्झीन असलेली गरम हवा बाहेर जाऊन बाहेरची थंड हवा आता येईल. त्यानंतर खिडक्या बंद करून एसी वापरा.
असे केल्यास बेन्झीन असलेली हवा बाहेर जाऊन त्याचा शरीरास कोणताही अपाय होणार नाही. तसेच बाहेरील ताजी हवा गाडीत आल्याने श्वसनासही कोणता त्रास होणार नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.