Omicron: लहान मुलांना ओमिक्रॉनचा संसर्ग का होतोय? तज्ञांनी सांगितले कारण
रुग्णालयात भर्ती होणाऱ्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या संक्रमणामुळे भर्ती करण्यात आलेली 671 मुले आहेत.
Omicron: अमेरिकेत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनचा सर्वाधिक संसर्ग हा लहान मुलांना होत आहे. रुग्णालयात भर्ती होणाऱ्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या संक्रमणामुळे भर्ती करण्यात आलेली 671 मुले आहेत. मुलांमध्ये संक्रमण वाढत असल्याने तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामते मुलांमध्ये संक्रमण वाढण्यामागे दोन कारणे आहेत. त्यामधील पहिले म्हणजे लोकसंख्येतील लसीकरण आणि दुसरे ओमिक्रॉन हा वेगाने फैलाव करत आहे.
जॉन हॉप्किन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे सिनियर स्कॉलर डॉ. अमेश अदलेजा यांनी फोर्ब्स यांना दिलेल्या एका मुलाखतीत असे सांगितले की, कोविडच्या संक्रमणामुळे रुग्णालयात भर्ती होणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होणे हे धक्कादायक फॅक्टर नाही आहे.(Omicron Scare: Pulse Oximeter ते Sanitizer Spray कोरोनाच्या पुन्हा गडद होणार्या सावटादरम्यान सुरक्षित राहण्यासाठी घरात ठेवाच या अत्यावश्यक गोष्टी!)
पुढे त्यांनी असे म्हटले की, ओमिक्रॉनचा वेगाने फैलाव होण्यासह मुलांच्या लसीकरणाचा दर सुद्धा कमी आहे. अमेरिकेत आतापर्यंत 5-11 वयोगटातील 25 टक्के आणि 12-17 वयोगटातील 64 टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. या व्यतिरिक्त 5 वर्ष किंवा त्याखालील मुलांना अद्याप लस दिलेली नाही.
डॉक्टर्सच्या मते, ओमिक्रॉन हा कोरोनाच्या दुसऱ्या वेरियंटच्या तुलनेत अधिक गंभीर लक्षण निर्माण करतो. अमेरिका अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या अध्यक्ष ली सेवियो बियर्स यांनी असे म्हटले की, वॉश्गिंटन डीसी मध्ये मुलांच्या रुग्णालायत मी काम करते तेथे भर्ती होणारी बहुतांश मुले ही 5 वर्षाखालील आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. येथे 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यन 18 वर्ष किंवा त्याखालील जवळजवळ 109 मुले रुग्णालयात भर्ती झाली.