New XEC COVID Variant: जगभर पसरतोय कोविडचा नवा व्हेरिएंट; जाणून घ्या त्याची लक्षणं, धोकादायक किती?

सध्या युरोपात हा व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे.

Virus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोविडची (COVID) भीती आता कमी झाली असली तरीही जगभर पुन्हा नव्या कोविड व्हेरिएंटने (COVID Variant) चर्चा सुरू झाली आहे. नवा कोविड वायरस व्हेरिएंट हा XEC आहे. सध्या हा व्हेरिएंट युरोपामध्ये झपाट्याने पसरत आहे. जगात पहिल्यांदा हा जून महिन्यात जर्मनीमध्ये आढळला. आता तो सुमारे 27 देशांमध्ये आढळल आहे. हा नवा स्ट्रेन omicron subvariants KS.1.1 आणि KP.3.3 चं कॉम्बिनेशन आहे.

KS.1.1 हा FLiRT variant आहे ज्यामुळे जगभरात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे तर KP.3.3 हा FLuQE variant आहे. यामध्ये amino acid glutamine म्युटेट होऊन gluatmic acidn झाले आहे. हे स्पाईक प्रोटीन मानवी पेशींमध्ये बाईडिंग मध्ये प्रभावी आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, XEC मध्ये नवे म्युटेशन आहे त्यामुळे लस आणि बुस्टर डोस घेणं आवश्यक आहे. सध्या युके मध्ये धोका अधिक असलेल्यांना मोफत बुस्टर डोस दिले जात आहेत.

XEC वर लस फायदेशीर ठरणार का?

XEC वर लस नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान लस सुरक्षित आहे आणि सार्‍या कोविड व्हेरिएंट शी सामना करू शकतात. XEC हे omicron variant चा प्रकार असल्याने लस या वायरसचा सामना करू शकतात.

XEC Covid ची लक्षणं

XEC variant ची लक्षणं देखील आधीच्या कोविड व्हेरिएंट प्रमाणेच आहेत. यामध्येही ताप, घशामध्ये खवखव, कफ, वास न येणं, भूक मंदावणं, अंगदुखी ही लक्षणं दिसतात. ओमिक्रॉनचाच हा व्हेरिएंट असल्याने रूग्णांमध्ये गंभीर आजार, हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची गरज कमी असणार आहे. अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention (CDC) नुसार, ताप किंवा थंडी वाजणं, खोकला, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, नाक वाहणं किंवा चोंदणं, चव किंवा वास कमी होणे, थकवा, स्नायू किंवा शरीर दुखी यांचा समावेश होतो. वेदना, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या आणि अतिसार ही लक्षणं आहेत.

जगभर कुठे आढळला नवा व्हेरिएंट ?

आतापर्यंत, पोलंड, नॉर्वे, लक्झेंबर्ग, युक्रेन, पोर्तुगाल आणि चीनसह 27 देशांतील 500 हून अधिक नमुन्यांमध्ये XEC आढळला आहे. खरं तर, Scripps Research च्या "Outbreak.info" वेब पेज वरील माहितीनुसार XEC व्हेरिएंट, 3 सप्टेंबरपर्यंत, 15 देश आणि 12 यूएस राज्यांमध्ये आढळून आला आहे. एका अहवालानुसार, ऑगस्टमध्ये स्लोव्हेनियातील 10 टक्के कोविड रूग्ण हे XEC variant चे आहेत. XEC चे डेन्मार्क आणि जर्मनीमध्ये 17 टक्के रूग्ण आहेत तर यूके आणि नेदरलँड्समध्ये 11-13 टक्क्यांसह रूग्ण वाढत आहेत. COVID Deaths in US: अमेरिकेमध्ये सलग तिसर्‍या आठवड्यामध्ये 1000 पेक्षा अधिक मृत्यूंची नोंद.

सुरक्षित कसं रहाल?

तज्ञांच्या मते, XEC variant पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण करणे. नुकत्याच समोर आलेल्या नवीन लसी KP.3.1.1 च्या आधीच्या KP.2 विरूद्ध प्रभावी असल्याचे मानले जाते. त्यामुळे, XEC variant च्या विरोधातही ते प्रभावी ठरेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif