नवरात्रोत्सव 2018 : आरोग्याचं गणित सांभाळत नवरात्रीत उपवास कसा कराल ?
पण उपवास हेल्दी पद्धतीने करणे गरजेचे आहे.
नवरात्रोत्सव अगदी आठवड्याभरावर येवून ठेपला आहे. देवीच्या या उत्सवात सगळे अगदी भक्तीभावाने देवीची आराधना करतात. उपवास हा या आराधनेचा एक महत्त्वाचा भाग. नवरात्रोत्सवात अगदी तरुण मंडळींपासून जेष्ठांपर्यंत सगळे श्रद्धेने उपवास करतात. पण उपवास हेल्दी पद्धतीने करणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. नऊ रात्री उत्सव साजरा केला जातो कारण...
उपवास करणे आरोग्यदायी असते का?
खरं तर आरोग्याच्या विचार करुनच उपवास ही संकल्पना अस्तित्वात आली. उपवासामुळे शरीर डिटॉक्स होते. उपवासादरम्यान घेतलेल्या सात्विक आहारामुळे मनही शांत, प्रसन्न होते. पण उपवासादरम्यान हेल्दी पदार्थांचे सेवन योग्य पद्धतीने करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे नवरात्रीचे उपवास हेल्दी पद्धतीने करण्यास काहीच हरकत नाही.
उपवासासाठी हेल्दी पदार्थ
# नवरात्री उपवास करताना चहा, कॉफीऐवजी ग्रीन टी घेऊ शकता.
# नाश्ता करण्याची सवय आपल्याला असते. मग उपवासाच्या वेळी सकाळी नेमके काय खावे? तर खजूर, सुकामेवा असे पदार्थ उत्तम ठरतील.
# नारळपाणी, मिल्कशेक जरुर प्या. त्याचबरोबर ताक देखील घेऊ शकता.
# साबुदाणा खिचडी किंवा थालीपीठ, राजगिऱ्याचे थालीपीठ असे पदार्थ तुम्ही खावू शकता.
# लहानशा भूकेसाठी आलू चाट, व्हेजिटेबल सूप हे हेल्दी पर्याय आहेत.
# तसंच फळे खा, दूध प्या. राजगिऱ्याच्या लाह्या दूधात घालून तुम्ही खावू शकता.
# सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या.
नवरात्रीच्या उपवासातही दांडीया/गरबा खेळण्याचा उत्साह अगदी दांडगा असतो. त्याचबरोबर दैनंदिन कामं काही चुकत नाहीत. त्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. नवरात्रोत्सवात अनवाणी चालण्याचे व्रत करताना 'अशी' घ्या पायांची काळजी !
चुकीच्या पद्धतीने उपवास केल्यास होतील दुष्परिणाम
-थकवा येणे
-अशक्तपणा जाणवणे
-रक्तातील साखर कमी झाल्यास चक्कर येणे
-झोप न येणे
-निस्तेजपणा
उपवास कोणी टाळावा ?
मधुमेहींनी आणि गरोदर स्त्रियांनी उपवास करणे टाळावे. कारण उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी खालवल्यास अधिक त्रास होऊ शकतो. तुम्हाला माहित आहेत का? प्राचीन कोल्हापूरचा वारसा जपणाऱ्या 'नवदुर्गा'