National Masturbation Day 2020: हस्तमैथुन ठरू शकतो वजन कमी करण्याचा मार्ग; अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी हस्तमैथुन कसे करावे? जाणून घ्या

या विषयावर कोणीच उघडपणे बोलत नाही. हस्तमैथुन करने ही नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन हा लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक उत्तम नैसर्गिक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही हस्तमैथुन करत असता तेव्हा तुमच्या किती कॅलरीज बर्न होतात, याचा विचार केला आहे का? हस्तमैथुन करताना आपण कठोर श्वास घेता. यावेळी आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होत असते. या सर्व प्रक्रियेत आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होत असतात. आज या लेखातून हस्तमैथुन आपल्याला वजन कमी करण्यास कशी मदत करते हे जाणून घेऊयात.

Masturbation Position (Photo Credits: Unsplash)

National Masturbation Day 2020: हस्तमैथुन (Masturbation) ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत खाजगी बाब आहे. या विषयावर कोणीच उघडपणे बोलत नाही. हस्तमैथुन करने ही नैसर्गिक आणि सहज क्रिया आहे. हस्तमैथुन हा लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक उत्तम नैसर्गिक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही हस्तमैथुन करत असता तेव्हा तुमच्या किती कॅलरीज बर्न होतात, याचा विचार केला आहे का? हस्तमैथुन करताना आपण कठोर श्वास घेता. यावेळी आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होत असते. या सर्व प्रक्रियेत आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होत असतात. आज या लेखातून हस्तमैथुन आपल्याला वजन कमी करण्यास कशी मदत करते हे जाणून घेऊयात.

हस्तमैथुन करताना किती कॅलरी बर्न होतात? या विषयावर अद्याप कोणताही अभ्यास केला गेलेला नाही. त्यामुळे हस्तमैथुन करतांना आपण बर्न केलेल्या कॅलरीची नेमकी संख्या अद्याप माहित नाही. मात्र, पीएलओएस जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सेक्स केल्यानंतर सरासरी 69 कॅलरी बर्न होतात. (हेही वाचा - Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे)

अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी हस्तमैथुन कसे करावे?

हस्तमैथुन हा ऑलिम्पिक-कॅलिबर खेळ नसतो. हस्तमैथुन करताना अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी आपल्याला आपल्या हृदयाच्या गतीचा कालावधी वाढवणे आवश्यक आहे. कॅलरीज बर्न करण्यासाठी आपण क्लिटोरिसला घासण्यास प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हाला जोरदार हालचाल करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढेल आणि जास्तीत-जास्त कॅलरीज बर्न होतील. हस्तमैथुन केल्याने आपल्या शरीरातील रक्त अभिसरणाची क्रिया सुरळीत होते. हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते. हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार, आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधारण गोष्ट आहे. हस्तमैथुन करताना हृदयाची गती वाढते, रक्ताभिसरण वाढते, मांसपेशी मजबूत होतात. या सर्व शारीरिक प्रक्रियेबरोबरचं तणावातून मुक्तता मिळते.