National Doctor’s Day 2020: डॉ. संजय ओक ते मुफ्फज़ल लकड़ावाला महाराष्ट्राच्या कोविड19 विरूद्ध लढ्यात हे डॉक्टर बजावत आहेत महत्त्वाची भूमिका!

महाराष्ट्रात डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak) हे टास्क फोर्सची धुरा सांभाळत आहेत. तर वरळीमध्ये चक्क डॉ. मुफ्फी लकडावाला (Dr. Muffi Lakdawala) यांनी 'आयसीयू ऑन व्हिल्स' सारखी अत्याधुनिक यंत्रणा बीएमसी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उभी केली आहे.

Covid Yodhas OF Maharashtra | Photo Credits: Twitter, Facebook Accounts

आज नॅशनल डॉक्टर्स डे (National Doctor’s Day) ! भारतामध्ये दरवर्षी 1 जुलैला डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा स्मृतिदिन राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या कोरोना व्हायरस संकटकाळात डॉक्टर हे अनेकांसाठी देवासमान झाले आहे. आज अनेकांचा जीव डॉक्टरांच्या हातात आहे. भारतासह महाराष्ट्र देखील आता 100 पेक्षा अधिक दिवस ही कोविड 19 विरूद्धची लढाई लढत आहे. अशामध्ये अनेक डॉक्टर्स त्यांचे वय, स्पेशलायझेशन, हुद्दा ते अगदी भूक तहान हरपून कोरोना व्हायरसचा पाठलाग करत आहे. 'वॉर व्हर्सेस व्हायरस' ची ही लढाई जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. नव्या तंत्रांचा वापर करून प्रभावी उपचारपद्धती राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही कोव्हिड योद्धांचे प्राणही गेले. मात्र आज मुंबईसह महाराष्ट्रात जागतिक आरोग्य संकटात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणारे काही कोव्हिड योद्धे आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. महाराष्ट्रात डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak) हे टास्क फोर्सची धुरा सांभाळत आहेत. तर वरळीमध्ये चक्क डॉ. मुफ्फी लकडावाला (Dr. Muffi Lakdawala) यांनी 'आयसीयू ऑन व्हिल्स' सारखी अत्याधुनिक यंत्रणा बीएमसी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उभी केली आहे.

कोरोना संकटामुळे लोकांचा डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बराच बदलेला असेल. आज नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा दिलेली अनेक उमदी मुलं देखील कोरोना संकटात रुग्णसेवेसाठी उतरली आहेत. मग जाणून घ्या महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे कोव्हिड योद्धे आणि योगदानाविषयी

डॉ. संजय ओक

Dr. Sanjay Oak | Photo Credits: Twitter/ Dr. Sanjay Oak

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस मुळे फैलावणार्‍या कोविड 19चा मृत्यूदर कमी करण्याच्या उद्दिष्टाने राज्य सरकारने कोव्हिड टास्क फोर्स नेमला आहे. या टास्क फोर्सची धुरा डॉ. संजय ओक सांभाळत आहेत. दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचाराची दिशा ठरवण्याची जबाबदारी या टास्क फोर्सची आहे. मागील 3 महिन्यात आपण मृत्यूदर कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत. डॉ. संजय ओक हे केईएमचे माजी डीन होते तर आता प्रिंस अली खान हॉस्पिटलचे सीईओ आहेत. Laparoscopic Surgery in Paediatrics साठी त्यांचा B. C. Roy Award देऊनही सन्मान करण्यात आला आहे.

संजय ओक यांच्यासोबतच डॉ. डी. वाय पाटील, हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. झहीर उडवाडिया, लीलावती हॉस्पिटलचे डॉ. नागांवकर, वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. केदार तोरस्कर, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. राहुल पंडित, लोकमान्‍य टिळक हॉस्पिटलचे डॉ. एनडी कार्णिक, पीएके हॉस्पिटलचे डॉ. झहिर विरानी, केईएम हॉस्पिटलचे डॉ. प्रविण बांगर आणि  कस्‍तूरबा हॉस्पिटलचे  डॉ. ओम श्रीवास्तव यांचादेखील टास्क फोर्समध्ये समावेश आहे.

डॉ. तात्याराव लहाने

Dr. Tatyarao Lahane | Photo Credits: Facebook

डॉ. तात्याराव लहाने हे नेत्ररोग तज्ञ म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असले तरीही सध्या कोरोना संकटकाळात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जगात कोरोनावर अद्याप ठोस औषध उपलब्ध नसल्याने अनेक पर्यायी आणि पुरक औषधांचा अभ्यास केला जात आहे. अ‍ॅलोपॅथीच्या सोबतीने आता आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीचा अभ्यास करून कोविड 19 च्या विळख्यातून कोणती पर्यायी औषधं वापारता येऊ शकतात याचा अभ्यास करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने आयुष टास्क फोर्स देखील निर्माण केलं आहे. याचं नेतृत्त्व सध्या डॉ. लहाने करत आहेत.

डॉ. मुफ्फज़ल लकड़ावाला

Muffazal Lakdawala | Facebook

डॉ. मुफ्फी लकडावाला यांची ओळख खरी बेरिअ‍ॅट्रिक सर्जन म्हणून आहे. पण कोरोना संकटकाळात त्यांच्यमधील डॉक्टर त्यांना शांत बसू देत नव्हता म्हणून त्यांनी पालिका,राज्य शासनासोबत वरळीच्या डोम मध्ये मुंबईकरांसाठी जम्बो फॅसिलिटी सेंटर उभारलं आहे. अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून अगदी मोजक्या आरोग्य सेवकांच्या मदतीने ते गरोदर, वृद्ध ते अगदी कॅन्सर पीडित कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यांनी आयसीयु ऑन व्हिल, स्वॅब टेस्ट व्हॅन सारखे चाकोरीबाहेर जाऊन नवे आणि प्रभावी मार्ग निर्माण करून व्हायरसचा पाठलाग गतिमान करण्याचा प्रयत्न केला.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या आकड्यामध्ये सुमारे 25% रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. दिवसागणिक वाढणारा आकडा आणि ठोस औषधांची कमतरता, अपुरी आरोग्य सेवक, डॉक्टरांची संख्या यामुळे मुंबई, पुणे, ठाणे , औरंगाबाद येथील स्थिती नियंत्रणाबाहेर जातेय की काय? अशी भीती होती. पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात डॉक्टरांची फौज या कोरोनाचं संकट थोपवण्यसाठी मेहनत करत आहे. आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने त्या प्रत्येकाच्या मेहनतीला सलाम करून डॉक्टरांच्या अथक परिश्रमाला सलाम करा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now