mRNA Cancer Vaccine Trial: कॅन्सर वरील उपचारांमध्ये आता 'mRNA'लस संजीवनी ठरणार? UK मध्ये ट्रायल्स सुरू

सध्या पहिली dubbed mRNA-4359 लस देण्यात आलेली व्यक्ती Surrey भागातील 81 वर्षीय skin cancer चा रूग्ण आहे.

Cancer (PC - pexels)

कॅन्सर (Cancer) हा दुर्धर आजारांपैकी एक आहे. जगभरात कोट्यावधी लोकं या आजाराने दरवर्षी जीव गमावत आहेत. अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या तान्ह्या मुलापासून अगदी वयोवृद्धाला या आजाराचा धोका असतो. वेळीच निदान झालं तर आजारावर मात करणं देखील शक्य आहे. पण आता वैज्ञानिक एक पाऊल पुढे टाकत कॅन्सरच्या उपचारामध्ये आणि त्याला रोखण्यासाठी नवी लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोविड प्रमाणे कॅन्सर वर देखील mRNA technology चा वापर करत लस बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Imperial College NHS Healthcare Trust आणि Imperial College, London, येथील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली प्रारंभिक टप्प्यातील मोबिलाइझ चाचणी सुरू करण्यात आली आहे. मॉर्डना सोबत mRNA cancer vaccines बनवण्यासाठी ब्रिटीश सरकारची पार्टनरशीप आहे. ही लस कर्करोगाच्या ट्यूमरच्या पेशींवरील विशिष्ट protein markers रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला हायलाइट करतात. रुग्णाची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नंतर एक संरक्षण तयार करते आणि कर्करोगावर हल्ला करते, ज्याचा पूर्वी शोध लागला नव्हता.

यूके च्या Hammersmith Hospital मध्ये काही रूग्णांना ही लस देण्यात आली आहे. त्यांच्यावर लसीची ट्रायल सुरू झाली आहे. सध्या अभ्यासामध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर, त्वचेचा कर्करोग आणि अन्य सॉलिड ट्युमर असलेल्या कर्करोगामध्ये लसीची सुरक्षा आणि परिणामकारकता पाहिली जात असल्याची माहिती युके बेस्ड न्यूज मीडीया आऊटलेट्स ला संशोधकांनी दिली आहे.

सध्या पहिली dubbed mRNA-4359 लस देण्यात आलेली व्यक्ती

Surrey भागातील 81 वर्षीय skin cancer चा रूग्ण आहे. अन्य उपचारांमध्ये मर्यादित प्रभाव दिसल्याने त्याने ट्रायल मध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचे किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान; Buckingham Palace ने केली पुष्टी.

लस परिणामकारक ठरल्यास या कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. ही लस अनेकांना जीवनदान देऊ शकेल सोबतच अधिक प्रभावी आणि कमी टॉक्सिक असणार आहे. सध्या संशोधक या लसीला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सध्या कॅन्सर वर दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 'Personalised' लसीचा समावेश होतो. यासाठी रूग्णाच्या ट्युमर मधून जेनेटिक मटेरीअल घेऊन विशिष्ट व्हॅक्सिन बनवली जाऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif