Monkeypox युरोपात 2 रेव्ह पार्टीमध्ये सेक्सद्वारा पसल्याचा खुलासा
London School of Hygiene and Tropical Medicine मध्ये प्रोफेसर असलेल्या Heymann यांच्या माहितीनुसार, मंकिपॉक्सची ही दहशत ही रॅन्डम असावी आणि एका इंफेक्शन वरून त्याचा शोध लावणं शक्य असू शकते.
कोरोनाच्या दहशतीमधून बाहेर पडल्यानंतर आता जगात मंकीपॉक्स धुमाकूळ घालत आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या नव्या आजाराबाबत चेतावणी देण्यात आली आहे. युरोपात मागील काही दिवसांत दोन रेव्ह्स मध्ये सेक्सुअल अॅक्टिव्हिटी मधून मंकिपॉक्सचा आजार पसरल्याची माहिती देण्यात आली आहे.
Dr. David Heymann ज्यांनी WHO’s emergencies department चे यापूर्वी नेतृत्त्व केले आहे त्यांनी The Associated Press ला दिलेल्या माहितीनुसार, स्पेन आणि बेल्जियम मध्ये मंकिपॉकस हा आजार लैंगिक संबंधांमधून पसरल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी हा आजार आफ्रिकेच्या पार पसरला नव्हता. हा आजार प्राण्यांमधून आला आहे.
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जखमांशी जवळच्या संपर्कात आल्यास मंकीपॉक्स पसरू शकतो आणि लैंगिक संपर्काने आता तो प्रसार वाढवला आहे असे दिसते आहे असेही ते म्हणाले. आफ्रिकेत अनेकजण wild rodents द्वारा मनुष्याला त्याची लागण झाली आहे.
युरोपामध्ये प्रामुख्याने मंकिपॉक्सच्या लागण झालेल्यांमध्ये पुरूषाचा पुरूषाशी असलेला लैंगिक संबंध कारणीभूत आहे. पण कोणत्याही आजारी व्यक्तीसोबत संपर्क आल्यास, आजारी व्यक्तीच्या कपड्यांच्या, बेडशीट्सच्या संपर्कात आल्यास हा आजार पसरत असल्याचं समोर आलं आहे.
सध्या WHO कडून जगात 90 पेक्षा अधिक रूग्ण नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये कॅनडा, स्पेन, इस्राईल, फ्रांस,अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. सोमवार 23 मे दिवशी डेन्मार्कने जाहीर केल्यानुसार, पोर्तुगाल मध्ये 37 नव्या केसेस समोर आल्या आहेत तर इटलीत 1 तर ब्रिटन मध्ये 37 नव्या केसेस समोर आल्या आहेत.
मंकीपॉक्सच्या आतापर्यंतच्या रूग्णांमध्ये सौम्य लक्षणांचे रूग्ण समोर आले आहेत. अद्याप मृत्यूंची नोंद नाही. तर लक्षणांमध्येही थंडी, ताप, पुरळ, चेहर्यावर किंवा गुप्तांगांमध्ये जखमा अशी लक्षणं आहेत. घरीच उपचार घेऊन अनेक जण काही आठवड्यात ठीक झाले आहेत. नक्की वाचा: Monkeypox Disease Through Sex: सेक्स केल्याने होऊ शकतो 'मंकीपॉक्स' आजार; गे आणि बायसेक्शुअल लोकांसाठी चेतावणी जारी .
मंकिपॉक्स प्रमाणेच असणार्या स्मॉलपॉक्सची उपलब्ध लस आणि उपचार पद्धती यासाठी देखील वापरली जात आहेत. मागील काही वर्षांत 6% संसर्गांमध्ये हा मंकिपॉक्स देखील जीवघेणा ठरला आहे.
एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, मंकिपॉक्सचा पहिला रूग्ण हा 2018,2019 मध्ये नायजेरियामधून ब्रिटन, इस्राईल, सिंगापूर मध्ये प्रवास केलेल्यांमध्ये आढळला आहे.
ब्रिटन, स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये आतापर्यंत आढळलेले रूग्ण हे तरूण पुरूष आहेत. ते जेव्हा लैंगिक आरोग्य क्लिनिकमध्ये जखमांसाठी उपचार घेण्यासाठी आले तेव्हा त्यांना संक्रमण वाढल्याचं समोर आले आहे.
London School of Hygiene and Tropical Medicine मध्ये प्रोफेसर असलेल्या Heymann यांच्या माहितीनुसार, मंकिपॉक्सची ही दहशत ही रॅन्डम असावी आणि एका इंफेक्शन वरून त्याचा शोध लावणं शक्य असू शकते. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मंकीपॉक्स लक्षणं नसलेल्या रूग्णांमधूनही पसरू शकतो का हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्याचा अभ्यासदेखील वेगाने केला पाहिजे आणि रोगाचा धोका असलेल्यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)