Monkeypox आजार त्याची लक्षणं दिसण्यापूर्वी देखील पसरलेला असू शकतो - ब्रिटिश संशोधकांचा दावा

Monkeypox Virus | (Photo Credits: Wikimedia Commons)

Monkeypox आजार त्याची लक्षणं दिसण्यापूर्वीच पसरत असल्याचा दावा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. पुर्वी असं सांगण्यात आलं होत की हा आजार एका आजारी व्यक्ती मधून दुसर्‍या व्यक्तीकडे जातो. काहींच्या चाचण्यांमधून हा आजार लक्षणं नसतानाही दुसर्‍यांना होऊ शकतो असं समोर आलं आहे.

आफ्रिकेमधून जगाच्या विविध भागांत पसरलेला हा आजार इतर आजारांच्या तुलनेत माईल्ड वायरल इलनेस आहे. या वर्षाच्या सुरूवातीला जगात अनेक देशांमध्ये या आजाराचे रूग्ण आढळले जे यापूर्वी मात्र दिसत नव्हते.

मंकिपॉक्स हा माईल्ड वायरल आजार आहे. आफ्रिकेत पश्चिम आणि मध्य भागामध्ये हा आजार एंडेमिकच्या रूपात पसरला होता. तेव्हापासून 78 हजार रूग्ण आणि 36 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सध्या हा आजार अजूनही हेल्थ इमरजन्सी च्या रूपात पसरत आहे. या आजाराचा संसर्ग क्लोज कॉन्टॅक्ट मधून होत आहे तर लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, अंगावर पसने भरलेले फोड, पुरळ यांचा समावेश आहे.

युके मध्ये हेल्थ सिक्युरिटी एजंसी कडून गोळा करण्यात आलेल्या माहितीमध्ये 2746 जणांची माहिती घेण्यात आली. हे रूग्ण मे ते ऑगस्ट मध्ये पॉझिटीव्ह आलेले होते. सामान्यपणे त्यांचे वय 38 होते आणि 95% पॉझिटीव्ह रूग्ण हे गे, बायसेक्शुअल किंवा पुरूषांसोबत शारिरिक संबंध ठेवणारे पुरूष होते. नक्की वाचा: धक्कादायक! Spain हून परतलेल्या व्यक्तीला एकाच वेळी Monkeypox, COVID-19 आणि HIV ची लागण .

मंकिपॉक्स आजारामध्ये आता हा आजार हाताळायचा कसा असा प्रश्न असताना रूग्णाला आयसोलेट करावं का? यावरही विचार झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक धनाढ्य देशांनी हाय रिस्क लोकांना लसीचा डोस दिला आहे. पण आफ्रिकेमध्ये या लसीचे डोस नाहीत.

Independent experts च्या मते, इतर अभ्यासाची देखील याला जोड मिळाली तर सहाजिकच जागतिक स्तरावर या संसर्गाचे परिणाम सकारात्मक आहेत.