Painless Patch वैद्यकीय क्षेत्रात ठरणार गेम चेंजर; अल्ट्रासाऊंडच्या मदतीने पेशींमध्ये पोहचवणार औषध

संशोधकांच्या दाव्यानुसार, हे तंत्र त्वचेच्या स्थितीत जसे की बर्न्स, त्वचेचा कर्करोग किंवा वृद्धत्वाची लक्षणे यावर उपचार करण्यासाठी औषधे वितरीत करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

wearable patch | YouTube @MITMediaLab

MIT च्या शास्त्रज्ञांनी एक नवीन वेअरएबल पॅच विकसित केला आहे जो त्वचेद्वारे औषधे अधिक कार्यक्षमतेने आणि वेदनारहितपणे देऊ शकणार आहेत. त्वचा मध्ये जाण्यासाठी अल्ट्रासाऊंड पद्धतीचा वापर केला जाणार आहे. यामुळे टॅटू असलेल्या स्कीन मध्ये देखील औषधं दिली जाऊ शकतात. याला Conformable Ultrasound Sonophoresis Patch (cUSP)म्हटलं जातं आणि त्यामध्ये hydrogel चा वापर केला जाणार आहे. त्याच्या द्वारा हे स्कीनला चिकटेल. पॅचच्या आत मध्ये चार ट्रान्सड्यूसर आहेत जे तांब्याच्या ट्रेसद्वारे कार्यान्वित होण्यासाठी जोडले गेले आहेत. प्रत्येक ट्रान्सड्यूसरच्या वर एक पोकळी आहे ज्यामध्ये द्रवामध्ये विरघळलेले औषधाचे मॉलिक्युल्स असतात आणि जेव्हा ट्रान्सड्यूसरला पॉवर मिळते तेव्हा ते व्हायब्रेट होतात आणि द्रवामध्ये बुडबुडे तयार करतात. यामुळे द्रवाचे मायक्रोजेट्स तयार होतात जे त्वचेच्या कठीण बाह्य थरात बर्निंग सेंसेशन तयार कर्य्य शकतील. नक्की वाचा: Vaccines for Cancer And Heart Disease: कर्करोग आणि हृदयविकारावर दशकाच्या अखेरापर्यंत लस येणार .

संशोधकांनी डुक्कराच्या त्वचेवर याचा प्रयोग केला आहे. अनेक सनस्क्रिन आणि मॉईश्चरायझरमध्ये मिसळल्या गेलेल्या niacinamide चा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता. cUSP द्वारा हे अल्ट्रासाऊंडच्या मदतीशिवाय पॅचपेक्षा 26 पट अधिक औषध त्वचेतून पाठवले गेले. दरम्यान हा रिसर्च   Advanced Materials या जर्नल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. एका व्हिडिओ द्वारा त्याची प्रक्रिया शास्त्रज्ञांनी दाखवली आहे.

संशोधकांच्या दाव्यानुसार, हे तंत्र त्वचेच्या स्थितीत जसे की बर्न्स, त्वचेचा कर्करोग किंवा वृद्धत्वाची लक्षणे यावर उपचार करण्यासाठी औषधे वितरीत करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. अधिक खोल गेल्यास याच टेक्नॉलॉजीचा वापर करून रक्तप्रवाहात फेंटॅनाइल किंवा इन्सुलिन किंवा प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोंस पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकणार आहे. यामुळे टॅटू काढण्याची प्रक्रिया देखील अधिक पेनलेस होऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif