ज्वारीची भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

त्यात सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे चांगले आहे. ज्वारीच्या भाकरीत पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम चे प्रमाण जास्त आहे, तसेच यामध्ये मिनरलचे प्रमाणही जास्त असल्या कारणाने रक्तदाब संतुलित राहतो.

Jwarichi Bhakri (Photo Credits: Instagram)

पचायला हलकी आणि आरोग्यदायी अशा ज्वारीच्या (Jvari) भाकरीचा आहारात समावेश केल्याने त्याचे खूप आरोग्यदायी फायदे तुम्हाला होऊ शकतात. ज्वारी ही तंतूमय पदार्थ असल्याने पोट साफ राहते. मुंबईत सहसा भाकरी जास्त बनवत नाही. कारण मुंबईच्या वातावरणात ती जास्त पचतही नाही. मात्र गावाकडे आजही ज्वारी, बाजरीच्या भाकरीला महत्व आहे. गावाकडे चपातीपेक्षा भाकरी हा प्रकार जास्त पाहायला मिळते कारण तेथील वातावरणही त्यासाठी पोषक असते. मात्र कोणत्याही वातावरणात पचण्यास हलकी असते ज्वारीची भाकरी.

ज्वारीच्या भाकरीचे फायदे खूपच गुणकारी आणि आरोग्यदायी असे आहेत. त्यात सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे चांगले आहे. ज्वारीच्या भाकरीत पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम चे प्रमाण जास्त आहे, तसेच यामध्ये मिनरलचे प्रमाणही जास्त असल्या कारणाने रक्तदाब संतुलित राहतो.

हेदेखील वाचा- World Breastfeeding Week: स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर

ज्वारी पचनास हलकी असल्या कारणाने आपले पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला ऍसिडिटी चा त्रास असेल, पचन व्यवस्थित होत नसेल, अपचनाचा त्रास असेल तर चपाती न खाता ज्वारीची भाकरी खा. याचबरोबर यामध्ये लोह याचे प्रमाण देखील असते. त्यामुळे पंडूरोग, अॅनिमिया याचा त्रास असलेल्यांना ज्वारीची भाकरी खाणे फायदेशीर ठरु शकतो. गर्भाशयाच्या आजारांवरही ज्वारीची भाकरी फायदेशीर ठरु शकते.

शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, जठरातील आम्लता कमी करण्यासाठी मदत होतो. इतकच नव्हे तर ज्वारीतील काही घटक कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)