Daisuke Hori: जपानी माणूस; जो 12 वर्षे झाली, दिवसातून झोपतो केवळ 30 मिनिटे

पण, एक जपानी माणूस (Japanese Man) याला अपवाद आहे. दावा केला जात आहे की, डायसुके होरी (Daisuke Hori) नावाचा हा व्यक्ती 12 वर्षांपासून दिवसातून फक्त 30 मिनिटे झोपतो (Japanese Man Sleeps Only 30 Minutes) आणि अर्ध्या तासाची ही झोप (Short Sleep) त्याला पुरेशी असते.

Sleep | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Sleep Habits: बहुतेक लोकांना निरोगी जीवनासाठी 6-8 तासांची झोप आवश्यक असते हे सर्वच जाणतात. पण, एक जपानी माणूस (Japanese Man) याला अपवाद आहे. दावा केला जात आहे की, डायसुके होरी (Daisuke Hori) नावाचा हा व्यक्ती 12 वर्षांपासून दिवसातून फक्त 30 मिनिटे झोपतो (Japanese Man Sleeps Only 30 Minutes) आणि अर्ध्या तासाची ही झोप (Short Sleep) त्याला पुरेशी असते. पश्चिम जपानमधील ह्योगो प्रीफेक्चरमधील हा 40 वर्षीय उद्योजक सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सांगितले जाते की, डायसुके होरी यांनी कमीतकमी झोपेसाठी त्यांचे शरीर आणि मन चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. धक्कादायक म्हणजे या जीवनशैलीमध्ये या महाभागाने आपली कार्यक्षमताही दुप्पट केली आहे.

कार्यक्षमता वाढविण्यासाठी कमी झोप

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, ने दिलेल्या वृत्तानुसार डायसुके होरी नावाच्या या उद्योजकाने त्याची कामाची कार्यक्षमता आणि एकूण जीवनाचा अनुभव वाढवण्यासाठी ही अत्यंत कमी झोपेची जीवनशैली स्वीकारली. तो सांगतो की, “जोपर्यंत तुम्ही कार्यरत आहात किंवा जेवणाच्या एक तास आधी कॉफी प्यायली आहे, तोपर्यंत तुम्ही तंद्री टाळू शकता.” इतकी मर्यादित झोप घेऊनही आपण नियमीतपणे सामान्य पद्धतीने सक्रीय असतो असे तो म्हणाला. (हेही वाचा, झोपेच्या कमतरतेमुळे होऊ शकता 'हे' गंभीर आजार; चांगल्या झोपेसाठी करा 'हे' उपाय)

झोपेची गुणवत्ता महत्त्वाची

डायसुके होरी यावर जोर देते की, झोपेच्या कालावधी पेक्षा झोपेची गुणवत्ता जास्त महत्त्वाची आहे. खास करुन डॉक्टर आणि अग्निशामक यांसारख्या अतितातडीच्या व्यवसायांमध्ये. ज्यांना नेहमी लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे. “ज्या लोकांना त्यांच्या कामात सतत लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्यांना दीर्घ झोपेपेक्षा उच्च दर्जाच्या झोपेचा अधिक फायदा होतो,” असेही तो सांगतो. (हेही वाचा, Bedtime Habits and Screen Time: झोपण्याच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाइम म्हणजे 'द सायलेंट रिलेशनशिप किलर')

झोप आणि विलक्षण जीवनशैली

होरीच्या विलक्षण जीवनशैलीचे विश्लेषण करण्यासाठी, जपानच्या योमिउरी टीव्हीने 'विल यू गो विथ मी?' या रिॲलिटी शोमध्ये तीन दिवस त्यांचे जवळून निरीक्षण केले. या शोमध्ये असे दिसून आले की, होरी पूर्ण उर्जेने उठण्यापूर्वी फक्त 26 मिनिटे झोपला होता. इतकी कमी झोप घेऊनही तो दिवसभर सामान्य व्यक्तीप्रमाणेच कार्यरत होता आणि आपले दैनंदिन काम करत होता. ज्यामध्ये त्याचे दैनंदिन काम आणि व्यायाम यांचा समावेश होता.

डायसुके होरी हा स्वत:तर कमी झोपतोच. पण, त्याही पलिकडे जाऊन त्याने सन 1016 मध्ये जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे त्यांनी 2,100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अल्ट्रा-शॉर्ट स्लीपर्स बनण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात, थाई एनगोक नावाच्या व्हिएतनामी माणसाने 60 वर्षांपेक्षा जास्त काळ झोप न घेतल्याचा दावा केला आहे. या 80 वर्षीय व्यक्तीने त्याच्या या स्थितीचे श्रेय 1962 मध्ये लहानपणी आलेल्या तापाला दिले होते. आपणास लहानपणी आलेल्या तापामुळे आपण झोपण्याची क्षमता गमावली असल्याचे त्याने सांगितले. त्याने म्हटले आहे की, विविध उपचार आणि झोपेच्या गोळ्या सेवन केल्या तरीही त्याचा निद्रानाश कायम आहे.