IPL Auction 2025 Live

Yoga Day 2022: मासिक पाळी व्यतिरिक्त महिला 'या' 2 आसनांनी इतर अनेक आरोग्य समस्यांवर करू शकतात मात

आज आपण अशाच दोन आसनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.

Upavistha Konasana (PC - Wikimedia Commons)

Yoga Day 2022: प्रत्येक महिलांवर इतक्या जबाबदाऱ्या असतात की, त्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने विविध समस्या उद्धभवतात. PCOS, PCOD ची समस्या आज महिलांमध्ये खूप सामान्य झाली आहे. आज आपण अशाच दोन आसनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. तसेच इतर अनेक समस्यांची शक्यता कमी करू शकता.

उपविष्टकोनासन - (Upavistha Konasana)

हे आसन केवळ मासिक पाळीच्या वेदना आणि इतर समस्यांपासून आराम देते असे नाही तर संपूर्ण शरीर तंदुरुस्त ठेवते. (हेही वाचा - Monsoon Health Tips: पावसाळ्यात 'या' 5 हेल्थ टिप्सचा अवलंब करून आजारांपासून रहा दूर)

उपविष्टकोनासनाचे फायदे -

या आसनाच्या सरावाने नियमित मासिक पाळी येण्याची समस्या दूर होते आणि त्या दरम्यान वेदना आणि पेटके येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. पेल्विक भागात रक्त परिसंचरण वाढवते. मन शांत होते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्याची समस्या दूर होते.

उपविष्टकोनासन कसे करावे?

बद्धकोनासन -

हे आसन अतिशय सोपे आणि फायदेशीर आहे. जे पीरियड्स दरम्यान आराम तर देतेच पण इतर अनेक समस्यांवर देखील प्रभावी आहे.

बद्धकोनासनाचे फायदे -

या आसनाचा सराव केल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या दुखण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. या आसनाच्या सरावाने पोटाच्या खालच्या भागाशी संबंधित अनेक स्नायू शिथिल आणि लवचिक बनवता येतात.

बद्धकोनासन कसे करावे?

दंडासनामध्ये बसा. गुडघा वाकवा आणि पायाची बोटे एकत्र जोडा. गुडघे वर न उचलण्याचा प्रयत्न करा. परंतु, त्यांना जमिनीच्या जवळ ठेवा. या स्थितीत राहून पाठीचा कणा सरळ ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक ते दोन मिनिटे या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.