COVID-19 Pandemic मध्ये हॉस्पिटलमध्ये जावून रक्तदान करणे धोकादायक? सुरक्षित रक्तदानासाठी काही खास टिप्स

जाणून घेऊया त्याची उत्तरे...

Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) उद्भवलेल्या कठीण काळात रक्त (Blood) आणि प्लेटलेट्स (Platelet) दान करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तसंच सर्वच स्तरातून रक्तदान (Blood Donation) करण्याचे आवाहनही केले जात आहे. परंतु, कोविड-19 (Covid-19) च्या संसर्गाच्या धोक्यामुळे रक्तदान करण्यास कोणी पुढे सरसावत नाही. हॉस्पिटलमध्ये जावून रक्तदान केल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्ग होण्याची भीती प्रत्येकाच्या मनांत आहे. पण रक्तदान केल्याने कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका कितीपत आहे? कोविड-19 ची चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तुम्ही रक्तदान करु शकता का? यांसारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्याचीच उत्तरे आपण जाणून घेऊया...

रक्तदान केल्यास कोविड-19 ची लागण होऊ शकते?

या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. रक्तदान केल्यामुळे किंवा करताना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचा कोणताही डेटा किंवा पुरावा उपलब्ध नाही. (रक्तदान करण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या)

हॉस्पिटलमध्ये जावून रक्तदान करणे म्हणजे कोविड-19 चा धोका वाढवणे?

# रक्तदान केंद्र, हॉस्पिटल येथे कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी पुरेशी व्यवस्था केलेली असते. त्यामुळे धोका अत्यंत कमी असतो.

# रक्तदान केंद्र किंवा हॉस्पिटल्समध्ये तज्ञ नियमित ग्लोव्हज बदलत असतात. मास्क तर नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर असतो.

# रक्तदान केलेल्या व्यक्तीकडून स्पर्श झालेल्या सर्व वस्तू नियमित स्वच्छ केल्या जातात. तसंच इतर साहित्य, हॉस्पिटलचा परिसर वेळोवेळी सॅनिटाइज केला जातो.

# प्रत्येक रक्तदात्यासाठी वेगळं इंजेक्शन, सुई वापरली जाते.

# हॉस्पिटल्समध्ये सॅनिटायझर्सची सोय असते.

# रक्तदात्याचा ताप चेक केला जातो.

# सध्याच्या काळात हॉस्पिटलमध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन केले जात आहे.

रक्तदान केल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते?

रक्तदान केल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही. याउलट तुमची रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीपेक्षा सुधारेल.

परंतु, इतर गैरसोय टाळण्यासाठी अपॉयमेंट घेऊन रक्तदान करण्यास जाणे योग्य ठरेल. तसंच त्यामुळे वेळ वाचेल आणि कोणताही गोंधळ होणार नाही.