Health Tips For Woman: महिलांनी आपले सैल पडलेले स्तन घट्ट करण्यासाठी 'या' घरगुती उपायांची घ्या मदत!

या कारणामुळे न केवळ महिलांचे तर तुरणींचे देखील स्तन सैल होतात. अशा वेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही हे सैल झालेले स्तन घट्ट करु शकतात.

Loose Breast (Photo Credits: pexels)

महिलांच्या (Woman) बाबतीत दिवसेंदिवस बदलत जाणारी फॅशन (Fashion) आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. काही महिलांना तसेच मुलींना फॅशन मुळे तर काही महिलांना प्रसूतीनंतर (Post Pregnancy) ही समस्या उद्भवते जी आहे 'स्तनांमध्ये (Breast) सैलसरपणा येणे'. ब-याचदा प्रसूतीनंतर महिलांमध्ये ही समस्या उद्भवते. बाळाला स्तनपान (Breastfeeding) केल्याने स्तनांतील शिरा सैल होता ज्याचा परिणाम अशा महिलांचे स्तन सैल होते तसेच यामध्ये अनेक महिला ब्रा वापरत नाही. म्हणूनही स्तन सैल पडते.

तर दुसरीकडे मोठ्या गळ्याचे ब्लाउज, ऑफ शोल्डर तसेच बॅकलेस टॉप्स यामुळे देखील महिला ब्रा वापरत नाही. या कारणामुळे न केवळ महिलांचे तर तुरणींचे देखील स्तन सैल होतात. अशा वेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही हे सैल झालेले स्तन घट्ट करु शकतात.

1. बर्फाने मॉलिश

बर्फाचा तुकडा घेऊन तो स्तनांभोवती फिरवावा. यामुळे स्तनांच्या त्वचेत ऊर्जा निर्माण होते आणि असे रोज केल्याने स्तनांत घट्टपणा येईल. How To Choose Perfect Bra: तुम्हाला कम्फर्टेबल व फॅशनेबल ठेवणारी ब्रा निवडताना नक्की फॉलो करा 'हे' गोल्डन रूल

2. काकडी आणि अंडं

काकडी आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळून फेटून घ्या. स्तनावर लावून 10 मिनिटापर्यंत मालीश करा. याने स्तनात ताठपणा येईल.

3. लिंबाची मॉलिश

लिंबाचा रस स्तनांवर लावून व्यवस्थित पसरवावा. यामुळे स्तनांमध्ये ताठपणा येईल.

4. अंड्यातील पांढरा भाग

अंड्यातील पांढरा भाग स्तनावर लावून काही वेळासाठी तसेच राहू द्या. याने त्वचेत ताठपणा येतो. यात लिंबाचा रसही मिसळू शकता. थोड्या वेळाने गरम पाण्याने स्तन धुऊन टाकावे.

5. पपईचा रस

एक कप पपई वाटून घ्या. याला फेटून यात चिमूटभर हळद पावडर मिसळा. लिंबाचा रस मिसळा आणि स्तनांवर लावून मालीश करा. नंतर 10 मिनिटांसाठी असेच राहून द्या. नंतर गार पाण्याने धुऊन टाका.

यासोबतच तुम्ही कोरफड जेलने देखील स्तनांची मॉलिश करु शकता. असे रोज 10 ते 15 मिनिटे करुन आंघोळ करुन स्तन धुवून टाकावे. असे केल्यास स्तनांमध्ये ताठरता येईल.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)