घरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit

घरातील ही 6 कामे केल्यावर तुम्ही Slim आणि Fit राहू शकतात.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

वजन कमी करण्यासाठी किंवा स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक काही ना काही उपाय करत असतात. तसेच स्पेशल डायटच्या मदतीने जिम लावण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी लोक करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, घरातील ही 6 कामे केल्यावर तुम्ही Slim आणि Fit राहू शकतात.

1. लादी पुसणे

लादी पुसणे हे मेहनीतीचे काम असते. हे काम करताना व्यक्तीची उठ बस होत असल्याने पायांचा व्यायाम होत असतो. तर कंबरेची सातत्याने हालचाल होत असल्याने कंबरेचासुद्धा व्यायाम होण्यास मदत होते. 20 मिनिटे लादी पुसण्याचे काम केल्यास 150 कॅलरीज कमी होतात.

2. भांडी घासणे

भारतात आजवरही जेवढे घरातील भांडी घासण्याचे साबण प्रसिद्ध झाले नसतील तेवढे घरातील कामवाली प्रसिद्ध झाली आहे. याचे मुख्य कारण व्यक्तीमधील वाढत चालेला आळशीपणा होय. मुख्यत: भांडी घासण्याचे काम केल्यास 125 कॅलरीज कमी होतात. तसेच शरीरातील वाढीव कॅलरीज कमी होण्यासही मदत होतो.

3. स्वत: जेवण बनविणे

आजकाल लोक ऑफिसमधील कामांमध्ये खूप व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्या जवळ जेवण बनविण्यास वेळ नसतो. मात्र स्वत: हून जेवण बनविण्याचे खूप फायदे आहेत. तसेच आपण जे आरोग्यदायी खाणं स्वत:च्या हाताने बनवितो त्याची चव उत्तम लागते. तर 100 कॅलरीज सुद्धा कमी होतात.

4.साफसफाई करणे

घरामध्ये साफसफाई करणे जास्त कोणाला आवडत नाही. तर घरातील काम करणाऱ्या काकू येऊन काम करण्यापेक्षा हे काम स्वत:हून केले तप उत्तम. त्यामुळे शरीराची हालचाल होत राहते आणि 125 कॅलरीज कमी होतात.

5. पीठ मळणे

तुम्हाला माहिती आहे का, चपातीसाठी पीठ मळणे हे किती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या कामामध्ये सतत हाताची हालचाल होत असल्याने शरीरातील 50 कॅलरीज कमी होतात.

6. कपडे धुणे

सध्या कपडे धुण्यासाठी बाजारात विविध पद्धतीच्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला हाताने कपडे धुण्याची सवय असेल तर त्याचा फायदा शरीराला होतो. तसेच 130 कॅलरीज या कामामुळे कमी होतात.