Healthy Heart Tips: जीम मध्ये वर्कआऊट करताना फीटनेस फ्रीक लोकांनी टाळल्या पाहिजेत 'या' चूका; अन्यथा हार्ट अटॅक चा धोका!

जास्त व्यायाम करणं टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. त्यामुळे आठवड्यातून काही दिवस मध्यम व्यायाम करा.

Heart Attack| Pixabay.com

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम हा गरजेचा आहे. काही जण हा सोयीनुसार घरच्या घरीच करतात तर काही जण जीम मध्ये वर्क आऊट करण्याला प्राधान्य देतात. पण जीममध्येच व्यायाम करताना अनेकांना हार्ट अटॅक (Heart Attack) येत असल्याच्या देखील बातम्या समोर आल्या आहे. राजू श्रीवास्तव आणि सिद्धांत वीर सूर्यवंशी हे दोन कलाकार देखील जीममध्ये वर्क आऊट (Gym Workout) करताना हार्ट अटॅक येऊन गेले. नेमकं या वाढत्या हार्ट अटॅक आणि जीम वर्क आऊट मध्ये कनेक्शन काय? हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर जाणून घ्या या काही खास गोष्टी !

हृदयविकाराचा झटका हा हृदयाच्या रक्तपुरवठा यंत्रणेत अडथळा निर्माण झाला की येतो. काहीवेळा हृदयाच्या स्नायूंच्या भागामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह मंदावतो किंवा काही प्रकरणांमध्ये अवरोधित होतो. अशा स्थितीत, रक्त प्रवाह शक्य तितक्या लवकर सामान्य न झाल्यास, स्नायूंमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, हृदयाचे स्नायू निकामी होऊ लागतात आणि परिणामी हृदयाचे ठोके थांबतात.

जीम मध्ये हार्ट अटॅकचं कनेक्शन ?

कोणत्याही व्यक्तीने व्यायाम करताना त्याच्या शारिरीक क्षमता लक्षात घेणं गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. अनेकदा शारीरिक क्षमता कमी असूनही अनेक लोक जिममध्ये अतिव्यायाम करतात. ज्याचा त्याच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. जेव्हा आपले हृदय सतत तणावाखाली असते किंवा त्यावर दबाव टाकला जातो तेव्हा ते तात्पुरते गंभीर स्वरूप धारण करते. याशिवाय ज्या लोकांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.

रोज व्यायाम करणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका कमी असतो पण रोज व्यायाम करणाऱ्या वृद्धांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असे मानले जाते. परंतु गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे. नक्की वाचा: Sudden Cardiac Arrest Awareness: भारतात हृदयविकाराच्‍या झटक्याच्‍या प्रमाणात वाढ होण्‍यामागे अनारोग्‍यकारक जीवनशैली व तणाव कारणीभूत; पहा हेल्दी हार्ट साठी Cardiologist ने दिलेल्या टीप्स .

'मेडिकल न्यूज टुडे'च्या माहितीनुसार, असे काही लोक आहेत जे पिळदार शरीर बनवण्यासाठी हेवी वेट ट्रेनिंग करतात. असे केल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जिममध्ये गेल्यावर लगेजच हेवी वेट ट्रेनिंग करण्याऐवजी, पहिल्यांदा तुमचं टार्गेट बनवा आणि त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने मेहनत करा.

जास्त व्यायाम करणं टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. त्यामुळे आठवड्यातून काही दिवस मध्यम व्यायाम करा. बैठ्याजीवनशैलीमुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सक्रिय राहणे महत्वाचे आहे. जर तुम्ही डेस्क जॉबवर काम करत असाल तर दर तासाला उठून थोडे चालत जा.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही.)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now