Health Tips: रिकाम्या पोटी खाण्या-पिण्याच्या 'या' गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन; अन्यथा होईल मोठ नुकसान
अन्यथा ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
Health Tips: आजच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतेक लोक पैशाच्या मागे धावतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होतं. खराब जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयीमुळे, लोक बर्याच आजाराचे बळी बनत आहेत. निरोगी राहण्यासाठी, संतुलित जीवनशैली आणि आहार घेणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक, आपल्या दैनंदिन आहारामध्ये (Daily Diet) अशा बर्याच गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या पोटी (Empty Stomach) चुकून खाऊ नये. अन्यथा ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टीचं सेवन करू नये, याबद्दल जाणून घेऊयात...
अल्कोहोल -
अल्कोहोलचे सेवन करणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. विशेषत: जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मद्यपान केले तर ते आणखी घातक ठरू शकतं. वास्तविक, रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने पोटाच्या आतड्यांचे बरेच नुकसान होते आणि यामुळे आरोग्यास त्रास होतो. म्हणून रिकाम्या पोटी अल्कोहोल पिणे टाळा. (वाचा - Health Benefits Of Banana Flowers: आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त आहे केळीचं फूल; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे)
सॉफ्ट ड्रिंक -
जर तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्याची आवड असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी त्याच सेवन करणं टाळावं. रिकाम्या पोटी शीतपेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सॉफ्ट ड्रिंकमध्ये सोडा जास्त प्रमाणात आढळतो. यात असणाऱ्या कार्बोनेट अॅसिडमुळे पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.
कॉफी -
बरेच लोक आपला दिवस गरम चहा किंवा कॉफीने सुरू करतात. परंतु, फारच कमी लोकांना माहिती आहे की, अनवशा पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये. त्यात असलेल्या कॅफिनमुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते आणि यामुळे आपण पोटासंबंधित आजारांना बळी पडू शकतो.
टोमॅटो -
टोमॅटोचा वापर भाजीपाला सोडून इतर अन्नपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बरेच लोक टोमॅटो कच्चे खातात. टोमॅटो आरोग्यासाठीही चांगले असतात. परंतु, अनवशा पोटी टोमॅटो खाल्यास सावधगिरी बाळगण आवश्यक आहे. कारण, ते तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी कच्चे टोमॅटो खाणे टाळा.
मसालेदार अन्न -
मसालेदार अन्न कोणाला आवडत नाही. परंतु मसालेदार अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन आपल्याला आजारी बनवू शकते. जर आपण जास्त प्रमाणात मसालेदार अन्न खाल्ले, तर आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या अॅसिडस् आणि मसाले यांच्यात एक रासायनिक प्रतिक्रिया घडते. ज्याचा आतड्यांवर दुष्परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये जळजळीची समस्या उद्धभवू शकते.
टीप- या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. आम्ही त्याची वास्तविकता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची हमी देत नाही. यामध्ये दिलेली माहिती कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी बदलली जाऊ नये. आम्ही असा दावा करीत नाही की या लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी आहेत किंवा नाही. म्हणून कृपया कोणत्याही टिप किंवा सूचना वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.