Health Tips: भरपूर प्रमाणात 'सी' व्हिटामिन असलेले ड्रॅगनफ्रूट खाल्ल्याने 'या' आजारांपासून राहाल दूर

हे आजार कोणते ते पाहा

Dragon Fruit (Photo Credits: PixaBay)

ड्रॅगनफ्रूट! (Dragon Fruit) या फळाचे नाव थोडे विचित्र वाटत असले तरी त्याच्या नावावर न जाता त्यापासून होणारे फायदे ऐकाल तर तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. भरपूर प्रमाणात सी व्हिटामिन (Vitamin C), कॅल्शियम (Calcium), लोह, पोटॅशियम असलेले हे फळं खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. पल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते.

वेगवेगळ्या पोषकतत्त्वांनी भरलेल्या या ड्रॅगनफ्रूटचे सेवन केल्यास तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. हे आजार कोणते ते पाहा

1. ह्याच्यामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. त्यामुळे पोटाचे विकार, अपचन यासारखा त्रास उद्भवत नाही. सावधान, कधीही एकत्र खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर उद्भवतील अनेक समस्या

2. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहिल्यामुळे मधुमेहाचा त्रास कमी होतो.

3. ह्यात बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकार सर्वावर मात करता येते.

4. हे फल खाल्ल्याने हाडं मजबूत होतात त्यामुळे संधीवाद, पाठदुखी, कंबरदुखी यांसारखे आजार उद्भवत नाही. Summer Health Tips: खरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात 'या' आजारांपासून स्वत:ला दूर ठेवण्यास होईल मदत

5. फळामध्ये लायाकोपेन नावाचे विकर असते. ते विटामीन सी बरोबर कॅन्सरचा प्रतिबंध करते.

6. गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते त्यामुळे हे फळ खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

त्यामुळे नावाप्रमाणे हा अनेक आजारांना गिळंकृत करणारा ड्रॅगन आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यासाठी ड्रॅगन फ्रूटचा तुमच्या आहारात समावेश करा. मात्र हे फळ किती आणि केवढ्या प्रमाणात खावे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif