Health Tips: दुधासोबत 'या' 7 गोष्टीचे सेवन टाळा, होऊ शकतात दुष्परीणाम

दुधाचा आहारातील समावेश हा आरोग्यदायी मानला जात असला तरी काही गोष्टी सोबत दुधाचे सेवन करणे आरोग्यावर दुष्परीणाम हा होऊ शकतो.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते आणि या पोषक तत्वांमध्ये दुधाचा समावेश आहे. अनेक लोकांच्या रोजच्या आहरात दुधाचा समावेश हा असतो. बहुतेक लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. तर काही असे आहेत जे सकाळी नाश्त्यात दूध पितात. कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक दुधात आढळतात. दुधाचा आहारातील समावेश हा आरोग्यदायी मानला जात असला तरी काही गोष्टी सोबत दुधाचे सेवन करणे आरोग्यावर दुष्परीणाम हा होऊ शकतो.

दुधासोबत या गोष्टीचे सेवन टाळा

दही : दह्याचे दुधाबरोबर कधीही सेवन करू नये. तसेच, दूध प्यायल्यानंतर दहीही खाऊ नये. कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

आंबट फळे : दुधाबरोबर आंबट फळे खाणेही टाळावे. दूध आणि आंबट फळे एकत्र सेवन केल्यास पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.

गूळ : गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात शंका नाही. दूध आणि गुळाचे एकत्र सेवन करणे हानिकारक मानले गेले आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.

मासे : मासे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण, आपण नेहमी दुधासह माशांचं सेवन टाळावे. यामुळे, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जसे की, पोटदुखी आणि अन्न विषबाधा इ. एवढेच नाही तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांही होऊ शकतात.

मसालेदार अन्न : जर तुम्ही अनेकदा दुधाबरोबर मसालेदार पदार्थ खात असाल तर आतापासून तसं करणं थांबवा.

सॉल्टेड स्नॅक्स : चिप्ससारख्या सॉल्टेड स्नॅक्ससोबत दूध पिण्याची चूक करू नका. कारण त्यात भरपूर मीठ मिसळले जाते, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते.

प्रथिने समृद्ध पदार्थ : दुधात प्रथिने आधीच मुबलक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रथिनेयुक्त अन्न खाण्यास सुरुवात केली तर अचानक तुमच्या पचनसंस्थेवरचा भार वाढू शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement