Jasmine Health Benefits: वर्षा ऋतुमध्ये बहरणाऱ्या 'चमेली' फुलाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
चमेलीच्या फुलांचा गजरा तुम्ही केलात माळलाही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? चमेलीच्या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. सुगंधाप्रमाणेचं या फुलाचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत.
Jasmine Health Benefits: पावसाळ्यात बहरणाऱ्या चमेली फुलांचा वास तुम्हाला नक्की आवडत असेल. चमेलीच्या फुलांचा गजरा तुम्ही केलात माळलाही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? चमेलीच्या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. सुगंधाप्रमाणेचं या फुलाचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत.
चमेलीच्या फुलाला जाती, सुमना, चेतिका, हृद्यगंधा अशा विविध नावांनी ओळखले जाते. याशिवाय चमेलीला इंग्रजीत जास्मीन (Jasmine) असं म्हटलं जात. चमेलीचा स्वाद कडू तसेच तुरट असतो. आज या लेखातून आपण चमेलीच्या फुल, पानांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात... (हेही वाचा - पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या)
तोंडातील फोडावर गुणकारी -
अनेकवेळा अम्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला किंवा तोंडात छाले निर्माण होतात किंवा छोट-छोटाले फोड येतात. यालाचं आपण तोंड येणं असंही म्हणतो. तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल, तर त्यावर चमेली पानाचा काढा गुणकारी ठरू शकतो.
दात दुखीवर गुणकारी -
तुम्हाला दातदुखीचा त्रास जाणवत असेल, तर त्यावर चमेलीचे पानं गुणकारी ठरू शकतात. चमेलीची पानं चावल्याने दात दुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
जखम भरून काढण्यास मदत -
चमेलीची पाने उत्तम व्रणरोपक आहेत. चमेलीचे पानं जखमा भरून काढण्यास मदत करतात. याशिवाय शरीरावर खाज, त्वचारोगावर चमेली पानं वाटून त्याचा लेप लावावा. त्यामुळे त्याठिकाणची खाज कमी होते. न भरणाऱ्या जखमा किंवा चिघळणाऱ्या जखमा असतील तर चमेलीच्या पानांचा काढा करुन जखमा प्रथम स्वच्छ करुन जात्यागी तेल लावल्यास जखम भरुन येण्यास मदत होते.
त्वचारोगावर गुणकारी -
चमेलीची पानं, फुलं अनेक त्वचारोगावर गुणकारी ठरतात. उदा. एक्जीमा, फंगल इन्फेक्शन इ. मध्ये चमेलीपत्रसिद्ध तेल अथवा पानांचा मूळाचा लेप लाभदायक ठरतो.
डोकेदुखी -
चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात. शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दौर्बल्यात चमेली तेलाने डोक्याला मालिश केल्याने आराम मिळतो. थंडीमुळे किंवा पाण्यात सतत काम करण्याने तळपायाला भेगा पडतात. अशावेळी चमेलीची पाने वाटून त्याचा लेप भेगांवर लावावा. त्यामुळे जखमा लवकर भरतात. तसेच चमेलीच्या तेलाने तळपायाची मालीश केल्याने तळपाय मऊ होतात.
कान दुखीवर गुणकारी -
कान दुखणे, कानात स्त्राव निघणे आदी त्रासावर चमेली गुणकारी ठरते. चमेलीचे तेल कानात टाकल्यास कान दुखीचा त्रास कमी होतो. याशिवाय मासिक स्त्राव कमी होत असल्यास चमेलीच्या पानांचा लेप ओटीपोटावर लावावा.
ताण कमी होण्यास मदत -
चमेलीच्या फुलाच्या सुगंधामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. तसेच मन प्रसन्न राहण्यास मदत होते.
रक्तविकारांवर गुणकारी -
शरीरातील विविध रक्तविकारांवर चमेलीचे फुलं किंवा पानं गुणकारी ठरतात. अनेक औषधी कल्पांमध्ये चमेलीचा वापर करण्यात येतो. सुगंधाशिवाय चमेलीच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आहेत. त्यामुळे आयुर्वेदात या फुलांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.