Hair Colouring Pros, Cons and Precautions: स्वत:च्या डोक्याचे केस रंगवणे चांगले की वाईट?
Hair Care Tips: केस रंगवण्याचा विचार करत आहात? केस रंगवण्यापूर्वी त्याचे फायदे, तोटे जाणून घ्या आणि काय खबरदारी घेऊ शकता याबाबतही वाचा.
Benefits Of Hair Coloring: केस रंगवणे (Hair Coloring) म्हणजेच केसांना रंग देणे किंवा ते डाय (Hair Dye) करणे हा अलिकडील काळातील एक ट्रेंड बनला आहे. जो स्त्रिया आणि काही प्रमाणात पुरुषांनीही सौदर्यांशी जोडून ठेवला आहे. ज्यामुळे लोकांना कृत्रिमपणे का होईना पण चकमदार केस घेऊन मिरवता येते आणि छे.. छे.. आपले केस पिकलेच नाहीत. ते पांढरे झालेच नाहीत अशी दर्पोक्तीही करता येते. पण ते काही असले तरी तुम्हाला माहिती आहे का, केस रंगवण्याचे अनेक फायदे (Hair Colouring Pros) आहेत, तसेच त्याचे काही तोटे (Disadvantages of Hair Dyeing) देखील आहेत. केसांचा रंग बदलण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, त्याचे फायदे, तोटे यांबाबत आवश्यक माहिती घेतली. तर केसांचे रंगरुप बदलताना आपण नक्कीच खबदारी घेऊ शकाल.
केसांना रंग देण्याचे फायदे
केस रंगविण्याचे नाना तऱ्हेचे फायदे असतात. अर्थात हे सर्व फायदे कृत्रिम आणि मनाला बरे वाटणारे, व्यक्तिमत्वात काहीसा उठावदारपणा आणणारे असतात. हे फादे खालील प्रमाणे:
- तुमचा प्रभाव वाढतो (Enhances Appearance): तुमचे केस रंगवल्याने तुमचा लूक ताजेतवाने होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास आणि स्टायलिश वाटतो.
- पांढरे आणि राखडी केस लपतात (Covers Gray Hair): लोक केसांना रंगवण्याचा पर्याय निवडण्याचे एक मुख्य कारण म्हणजे राखाडी किंवा पांढरे केस लपवणे आणि तरुणपणा टिकवून ठेवणे.
- आत्मविश्वास वाढवते (Boosts Self-Confidence): पांढरे केस म्हणजे आपल्याकडे म्हातारपणाचे लक्षण मानले जाते. पण खरे तर त्यात तथ्य नाही. बदलती जीवनशैली, केशरचना, आहार आणि इतर अनेक कारणांमुळे केस पांढरे होतात. आपल्याकडे त्याला केस पिकने असेही म्हणतात. त्यामुळे तुम्ही जर केस रंगवत असाल तर तुमच्यासाठी ते नाविन्यता देऊ शकतो. ज्याचा आत्मविश्वासात भर पडण्यास मदत होऊ शकते.
- वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी: केसांचा रंग तुम्हाला काहीसा व्यक्तीगत अभिव्यक्ती (Personal Expression) वाढविण्यास मदत करतो.
- तात्पुरते किंवा कायमचे पर्याय: तुम्हाला अल्पकालीन बदल हवा असेल किंवा दीर्घकालीन परिवर्तन, तुमच्या पसंतीनुसार विविध प्रकारचे रंग उपलब्ध आहेत.
केस रंगवण्याचे तोटे
केस रंगवण्याचे जसे फायदे असतात तसेच त्याचे काही तोटेही असतात. तेज आपण विचारात घेतले तर ते रंगवावेत किंवा नाही याबाबत आपल्याला खबरदारी घेता येऊ शकते. केस रंगवण्याचे तोटे खालील प्रमाणे:
- केसांचे नुकसान (Hair Damage): रासायनिक रंगांचा वारंवार वापर केल्याने केस कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे ते कोरडे, रुक्ष आणि तुटण्याची शक्यता असते.
- टाळूची जळजळ आणि ऍलर्जी (Scalp Irritation and Allergies): काही लोकांना केसांच्या रंगांमध्ये असलेल्या कठोर रसायनांमुळे खाज सुटणे, लालसरपणा किंवा जळजळ यासारख्या ऍलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकतात.
- आर्थिक खर्च वाढतो: रंगवलेल्या केसांचा रंग कालांतराने फिकट होतो. त्यामुळे त्याला सतत रंगविण्याची गरज भासते. सहाजिकच ते महाग आणि वेळखाऊ असू शकते. त्यामुळे तुमचा आर्थिक खर्चही वाढू शकतो.
- रासायनिक संपर्क: अनेक रंगांमध्ये अमोनिया, पेरोक्साइड आणि इतर कठोर रसायने असतात जी जास्त वापरल्यास केस आणि टाळूला नुकसान पोहोचवू शकतात.
- अनपेक्षीत परिणाम: निसर्गत: मिळालेला कोणताही रंग नेहमी श्रेष्टच असतो. पण त्यावर जर कृत्रिम रंग फासला तर त्याची कृत्रिमता झाकली जात नाही. ती लपवता येते पण फार काळ टीकत नाही.
(हेही वाचा, Lifestyle And Hair Loss: तणावग्रस्त जीवनशैली ठरते केसगळती आणि टक्कल पडण्यास कारण? तुम्ही असता सतत व्यग्र असता का?)
केस रंगवताना घ्यावयाची खबरदारी
केस रंगवणे ही सहाजिकच कृत्रिम कृती आहे. त्यामुळे ती करताना काळजी घेणे आवश्यक असते. ज्यामुळे केसांचे, टाळूचे आणि डोक्याच्या त्वचेचे नुकसान होऊ नये याबाबत अधिक सजक असावे लागते. त्यासाठी आपण खालीप्रकारे खबरदारी घेऊ शकता:
- पॅच टेस्ट करा: तुमच्या केसांना रंग लावण्यापूर्वी 24 तास आधी तुमच्या त्वचेवर थोड्या प्रमाणात डाईची चाचणी करा जेणेकरून अॅलर्जीची प्रतिक्रिया तपासता येईल.
- अमोनिया-मुक्त किंवा नैसर्गिक रंग वापरा: केसांचे नुकसान कमी करण्यासाठी मेहेंदी किंवा इंडिगो सारखे सौम्य फॉर्म्युले किंवा हर्बल पर्याय निवडा.
- केसांना खोलवर कंडीशन करा: रंगवण्यापूर्वी आणि नंतर मॉइश्चरायझिंग मास्क आणि कंडिशनर वापरून तुमचे केस हायड्रेट ठेवा.
- वारंवार रंगवणे टाळा: जास्त नुकसान आणि कोरडेपणा टाळण्यासाठी रंगवण्याच्या कामांमध्ये किमान 6-8 आठवडे वाट पहा.
- तुमच्या टाळूचे रक्षण करा: त्वचेची जळजळ टाळण्यासाठी केसांच्या रेषेभोवती पेट्रोलियम जेली किंवा तेलाचा थर लावा.
- सल्फेट-मुक्त शांम्पू वापरा: कठोर शैम्पू रंग लवकर काढून टाकू शकतात, म्हणून सल्फेट-मुक्त आणि रंग-सुरक्षित उत्पादने निवडा.
- हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग आयर्नचा जास्त वापर रंगवलेले केस रुक्ष आणि निस्तेज बनवू शकतो.
केस रंगवणे हे तुमचा लुक बदलण्यासाठी एक खास मार्ग असू शकतो. परंतू त्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे तपासून पाहणे महत्वाचे आहे. योग्य खबरदारी घेतल्यास नुकसान कमी होण्यास मदत होते आणि दीर्घकाळ टिकणारे, निरोगी परिणाम सुनिश्चित होतात. जर तुम्ही केस रंगवण्याच्या बाबतीत नवीन असाल, तर तुमच्या केसांच्या प्रकार आणि स्थितीनुसार सर्वोत्तम पर्याय निवडण्यास व्यावसायिक हेअरस्टायलिस्टचा सल्ला घेण्यास मदत होऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)