Hair Care Tips: केसांना तेल लावताना चुकूनही करु नका 'ह्या' गोष्टी नाही तर पडू शकते टक्कल
मात्र तेलाने केसांना मसाज करत असताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे अन्यथा टक्कल पडण्याची देखील शक्यता असते
रोजच्या दगदगीच्या जीवनात थकून भागून घरी आल्यावर रात्री झोप मिळावी यासाठी अनेक जण केसांना तेल लावून छान मसाज करतात. यामुळे डोके ही हलके होते आणि डोक्यातील सगळे विचार बाजूला ठेवून एखाद्याला शांत झोपही लागते. हे जितके खरे असले तरीही तेल लावताना अथवा तेलााने डोक्याला मसाज करताना काही विशेष काळजी घेण गरजेचे आहे. अन्यथा तुमचे छान लांबसडक केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी केसांना तेलानं मसाज करणं फायदेशीर असल्याचं मानलं जातं.
तेलानं मसाज केल्यानं केसांचं योग्य पोषकतत्व तर मिळतात त्याचबरोबर केसांटी चमकही चांगली राहते. मात्र तेलाने केसांना मसाज करत असताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे अन्यथा टक्कल पडण्याची देखील शक्यता असते. Hair Care Tips: केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल 'कढीपत्ता'; जाणून घ्या फायदे
1. केवळ टाळूच नव्हे तर संपूर्ण केसांनाही तेल लावावे.
2. किमान एक तास तरी केसांना तेल लावून ठेवावे. यानंतर एक टॉवेल गरम पाण्यानं ओला करा. या टॉवेल तेल लावलेल्या केसांवर गुंडाळा. यामुळे टाळूवरील त्वचेची छिद्र उघडली जातात आणि तेल सहजपणे आतपर्यंत पोहोचते.
3. तेल लावल्यानंतर तासाभरानं कोमट पाण्यानं केस धुवावेत
4. टाळूच्या त्वचेमध्ये नैसर्गिक स्वरुपातही तैलग्रंथी असतात, यामुळे त्वचेला ओलावा मिळतो. केसांना जास्त वेळ तेल लावून ठेवल्यास त्वचा आवश्यकतेपेक्षा जास्त तेलकट होते. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येण्याची शक्यता असते.
5. टाळू जास्त रगडू नका. यामुळे केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. केस तुटण्याची शक्यता अधिक असते.
या गोष्टी तेलाने केसांना मसाज देत असताना नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे अन्यथा तुमचे केस वाढण्याऐवजी ते गळण्याची संभावना निर्माण होऊ शकते.