Green Corridor: फुफ्फुसाने एका तासात पार केले पुणे ते हैदराबाद अंतर, वाचवले एकाचे प्राण
त्यानुसार जोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) पुणे यांनी रविवारी (16 ऑगस्ट) निश्चित केले की अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य वेळेत हैदराबादला पोहोचवावे.
हैदराबाद (Hyderabad) येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका रुग्णाला पुण्यातील एका रुग्णामुळे जीवदान मिळाले आहे. या रुग्णाने दान केलेल्या फुफ्फुसाने पुणे ते हैदराबाद (Pune-Hyderabad) असा प्रवास केला. त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी दाखवलेली समयसूचकता आणि ग्रीन कॉरिडोर ( Green Corridor) या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. प्राप्त माहितीनुसार, हैदराबाद येथील केआयएमएस हार्ट अॅण्ड लंग्ज ट्रान्सप्लांट इन्स्टीट्यूट येथे एका रुग्णावर उपचार सुरु होते. हा व्यक्ती फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होता. या रुग्णाने तेलंगना सरकारच्या जीवदान योजने अंतर्गत नाव नोंदवले होते.
दरम्यान, पुणे येथील एका खासगी रुग्णालयात ब्रेन डेड घोषीत करण्यात आलेल्या एका युवकाचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार जोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) पुणे यांनी रविवारी (16 ऑगस्ट) निश्चित केले की अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य वेळेत हैदराबादला पोहोचवावे.
तेलंगनाच्या जीवनदान योजनेचे प्रभारी डॉ. स्वर्णलता यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेने योग्य काम केले. झेडटीसीसीच्या केंद्रीय समन्वयक आरती गोखले यांनी अवयव प्रवासाची मोहीम यशस्वी होण्यासाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल अशी योजना तयार केली. त्यानुसार पुणे येथून हैदराबादसाठी एका खास विमानाने हे फुफ्फुस हैदराबादला निघाले. त्यासाठी भारतीय एयरपोर्ट अथॉरिटीचीही मदत घेण्यात आली. (हेही वाचा, Fact Check: कबुतरामुळे होतो 'Hyper Sensitive Pneumonia' आजार? पनवेल शहर महानगरपालिकेचे 'ते' परिपत्रक खोटे; जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या मेसेज मागील सत्य)
अखेर केआयएमएस हार्ट अँण्ड लंग्ज ट्रान्सप्लांट इंन्स्टीट्यूट हैदराबद येथे हे फुफ्फुस सायंकाळच्या वेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचले. या फुफ्फुसाने तब्बल 560 किलोमिटरचा प्रवास केला. त्यासाठी एक तासाचा अवधी लागला. हे फुफ्फुस एका व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात आले.