How To Increase Sperm Count: शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; जाणून घ्या नैसर्गिक घरगुती उपचार

ज्याप्रमाणे स्पर्मची संख्या घटते तशीच आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास ही संख्या वाढवता सुद्धा येऊ शकते.आज आपण यासाठीचा सर्वात सोप्पा आणि नैसर्गिक उपचार जाणुन घेणार आहोत.

Superfoods That Increase Sperm Count (Photo Credits: File Image)

कोरोनामुळे (Coronavirus)  जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown)  काळात घरबसल्या वजन वाढतेय, फार हालचाल नसल्याने सुस्ती आलीये असे त्रास तुम्हाला सुद्धा होत असतील. अशा जीवनशैलीचा परिणाम गंभीर होऊ शकतो.  पुरुषांच्या बाबत तर थेट शुक्राणूंवर (Sperm Count) हा प्रभाव जाणवू शकतो. अन्य वेळी सुद्धा धावपळीच्या आयुष्यात अवेळी खाणे, व्यायाम न करणे अशा सवयींमुळे अनेकदा स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या कमी होते. अनेकदा ही बाब पुरुष स्वतःमधील कमतरता मानतात, मात्र असे समजून निराश होण्याची गरज नाही. आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास ही संख्या वाढवता येऊ शकते. आज आपण यासाठीचा सर्वात सोप्पा आणि नैसर्गिक उपचार जाणुन घेणार आहोत. हा उपाय म्हणजे आपल्याला रोजच्या आहारात काही गोष्टी समाविष्ट करुन घ्यायच्या आहेत. मुख्य म्हणजे या  गोष्टी  किचन मध्ये किंवा बाजारात सुद्धा सहज सापडतील.Sex Tips: Boring झालेल्या सेक्स लाईफला नव्याने अनुभवण्यासाठी 'या' टिप्स नक्की येतील कामी, लॉकडाऊनचाही होऊ शकतो फायदा

 Sperm Count वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचे सेवन ठरेल फायदेशीर

1) मसूर डाळ - मसूरच्या डाळीमध्ये फॉलिक अ‍ॅसिडचे घटक असतात. हे घटक पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यात मदत करतात. मसूरच्या डाळीचे पाणी सूप म्ह्णून प्यायल्याने सुद्धा स्पर्म्स साठी फायद्याचे ठरते.

2) डार्क चॉकलेट- डार्क चॉकलेट च्या सेवनाने टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढीस मदत होते. यामध्ये अधिक गोडवा नसल्याने आरोग्यास अपाय होत नाही.

3) लसुण - दोन लसणाच्या पाकळ्या ताज्या पाण्यासोबत घेतल्याने स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. यातील झिंकचे सत्व हे शुक्राणुंची संख्या वाढवण्यात कामी येते. हेच सत्व तीळ,ओट्स,शेंगदाणे यातुन सुद्धा मिळतात.

4) गाजर - गाजरामध्ये केरोटीन नावाचे रसायन असते, जे शुक्राणूंची संख्या तर वाढवतोच सोबतच त्यांची गुणवत्ताही सुधारतो. पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी गाजर फार फायद्याचे मानले आहे.

5) केळी-  शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी केळ्यांचे नियमित सेवन  फायदेशीर ठरते . यातून शरीरास ऊर्जा व मुबलक प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.

COVID-19 Health Tips: शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी 'या' गोष्टींच सेवन करा - Watch Video

फॅमिली प्लांनिंग करत असताना महिलेसोबतच पुरुषाच्या आरोग्याची सुद्धा तपासणी करणे आवश्यक असते.अनेकदा गर्भधारणेत समस्या येत असताना महिलांना दोषी ठरवले जाते मात्र पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या मुबलक आहे का हा मुद्दा दुर्लक्षित केला जातो. त्यामुळे ही बाब सुद्धा लक्षात घ्यायला हवी आणि जर का त्यामध्ये पुरुषात कमी आढळली तर त्यावरून कमीपणा न बाळगता हे उपाय नक्कीच ट्राय करता येतील. अर्थात यासाठी आवश्यक तो वैद्यकीय सल्ला घेणे कधीही उत्तम!



संबंधित बातम्या