Canada First Human Bird Flu Case: कॅनडामध्ये H5N1 बर्ड फ्लूच्या पहिल्या मानवी प्रकरणाची पुष्टी; कोलंबियातील किशोरवयीन मुलाला लागण

ब्रिटिश कोलंबियातील एका किशोरवयीन मुलाला 9 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची H5 एव्हियन इन्फ्लूएंझासाठी संभाव्य सकारात्मक चाचणी केली गेली. बुधवारी त्याला H5N1 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली.

Bird Flu प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य -Getty Image)

Canada First Human Bird Flu Case: पब्लिक हेल्थ एजन्सी ऑफ कॅनडाने (Public Health Agency of Canada PHAC) देशातील H5N1 एव्हीयन इन्फ्लूएंझा (H5N1 Avian Influenza) च्या पहिल्या मानवी प्रकरणाची (Human Case) पुष्टी केली आहे. ब्रिटिश कोलंबियातील एका किशोरवयीन मुलाला 9 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची H5 एव्हियन इन्फ्लूएंझासाठी संभाव्य सकारात्मक चाचणी केली गेली. बुधवारी त्याला H5N1 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. यासंदर्भात पब्लिक हेल्थ एजन्सी ऑफ कॅनडाने एका निवेदनात माहिती दिली आहे.

विषाणूची लागण झालेल्या किशोरवयीन रुग्णाला सध्या बीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बीसी सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत त्याची H5 चाचणी पॉझिटिव्ह आली. आरोग्य अधिकारी संक्रमित किशोरवयीन मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2003 पासून पाच देशांमध्ये H5N1 चे 903 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 464 प्रकरणे गंभीर होती. तज्ञांच्या मते H5N1 ची अनेक लक्षणे इन्फ्लूएंझा आणि कोविड-19 सारखीच आहेत. अमेरिकेत H5N1 चे पहिले प्रकरण 2024 मध्ये नोंदवले गेले. (हेही वाचा - Mumbai Healthcare Facilities: मुंबईत मधुमेह सर्वात प्राणघातक आजार, सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता; Praja Foundation ने प्रसिद्ध केला शहरातील आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकणारा धक्कादायक अहवाल)

दरम्यान, H5N1, H7N9, H7N7, H9N2 सारखे एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू मानवांमध्ये पसरू शकतात. H5N1 संसर्गामुळे मृत्यू दर 50% पर्यंत असू शकतो. संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या मांसाला स्पर्श केल्याने हा विषाणू मानवांमध्ये पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. (हेही वाचा - Medicines Banned in India: सावधान! Paracetamol आणि Cough Syrup सह 49 औषधे गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी; येथे पहा संपूर्ण यादी)

तथापी, कॅनडातील डेअरीमधील जनावरांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेलेली नाहीत. तसेच दुधाच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूच्या विषाणूचा कोणताही पुरावा आढळला नाही, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याशिवाय, युनायटेड स्टेट्समधील दुग्धोत्पादक जनावरांमध्ये आढळलेल्या H5N1 विषाणूचे क्लेड ब्रिटिश कोलंबियामध्ये नोंदवलेल्या मानवी केसांपेक्षा वेगळे आहे, असे PHAC ने म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now