डच येथील स्त्रीरोगतज्ज्ञाने पालकांना न सांगता स्वतःहा च्या Sperm चा वापर करत दिला १७ बालकांना जन्म
अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डच रूग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञाने ( Gynecologist )स्त्रियांना माहिती न देता स्वत:हा च्या शुक्राणूंची देणगी देऊन सुमारे 17 मुलांना जन्म दिला आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.स्त्रीरोग तज्ञ जॅन वाइल्डस्चूट( Jan Wildschut ) यांचा मृत्यू झाला आहे. ते 1981 ते 1993 या काळात ईस्टर्न कडील ( Zwolle ) झ्वोले सिटी येथे सोफिया रुग्णालयात कार्यरत होते. जे आता इस्ला या नावाने ओळखले जाते.
इस्ला रुग्णालयात यांना असे आढळले की, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आणि शुक्राणू दाता हे दोघे एकच आहेत. असे रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे.दरम्यान अधिकार्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञांचे डीएनए प्रोफाइल तयार केले आहे जेणेकरुन रुग्णालयात नवीन जन्माला येणारी अन्य मुले त्यांचे जैविक पालक आहेत की नाही हे तपासू शकतील.
महिलेला न सांगता स्वतःच्या शुक्राणूंचा वापर करण्यात येणारी ही पहिली घटना नसून.गेल्या वर्षी डीएनएच्या निकालांनी हे सिद्ध केले की जन कर्बात (Jan Karbaat ) नामक स्त्रीरोगतज्ज्ञांने स्वत: चा शुक्राणू वापरत असल्याची माहिती पालकांना न सांगता किमान 49 मुलांना जन्म दिला.ते रॉटरडॅम येथे 30 वर्ष ते एक स्वतःच क्लिनिक चालवत होते.डच येथे कायद्यानुसार एक शुक्राणु दाता 25 वेळा बाळांना जन्म देण्यासाठी त्याच्या शुक्राणूचा उपयोग करु शकतो तेथे 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना शुक्राणू दात्याची ओळख शोधून काढण्याचा अधिकार आहे.