Drinking Soda Raises Heart Attack: सावधान! सोडा प्यायल्याने वाढतो हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका; नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा

स्वीडनमधील 70,000 सहभागींसोबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, नियमित सोडा सेवन केल्याने स्ट्रोक, हृदयविकार आणि अनियमित हृदयाचा ठोका यासह विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

Drinking Soda, Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Drinking Soda Raises Heart Attack: दिवसेंदिवस तरुणांमधील हृदयविकाराचा (Heart Attack) धोका वाढत आहे. अशातचं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात सोडा (Soda) प्यायल्याने हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी सोड्याचे सेवन करणे हानिकारक नसल्याचं समोर आलं आहे. स्वीडनमधील 70,000 सहभागींसोबत केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, नियमित सोडा सेवन केल्याने स्ट्रोक, हृदयविकार आणि अनियमित हृदयाचा ठोका यासह विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. तज्ञांच्या मते, नेहमी शीतपेये किंवा सोडा पिणाऱ्यांनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी याचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

पिण्याचा सोडा वाढवतो हृदयविकाराचा धोका -

स्वीडनमध्ये केलेल्या अभ्यासात सोडा पिण्याच्या आरोग्याच्या जोखमींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संशोधकांनी 1997 ते 2009 पर्यंत सहभागींचा मागोवा घेतला. संशोधकांनी सॉफ्ट ड्रिंक्स, साखर पेये, जाम, मध, कँडी आणि आइस्क्रीम यांसारख्या विविध साखर-युक्त स्रोतांचे सेवन करणाऱ्यांचा आढावा घेतला. 20 वर्षांहून अधिक पाठपुरावा केल्यानंतर, अंदाजे 26,000 सहभागींना हृदयरोग झाल्याचे समोर आले. (हेही वाचा - (हेही वाचा -Heart Attack: वीकेंडला जास्त झोपणे तुमच्यासाठी फायदेशीर, हृदयविकार होऊ शकतात दूर)

सॉफ्ट ड्रिंक्सचा आरोग्यावर परिणाम -

सॉफ्ट ड्रिंक्स किंवा सोड्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते. ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हृदय तज्ञांनी सांगितले की, सोड्यामध्ये प्रामुख्याने रिक्त कॅलरी असतात. शीतपेयांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. ज्यामुळे इन्सुलिन संप्रेरकचे प्रमाण वाढते. या प्रक्रियेमुळे शरीरात जळजळ होते आणि मज्जातंतूंना गंभीर नुकसान होऊ शकते. कालांतराने, यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका वाढतो. (हेही वाचा -Rate of Heart Attack Increase On Mondays: सोमवारी हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! डॉक्टरांनी दिला इशारा; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या)

सोडा प्यायल्यामुळे होणाऱ्या समस्या -

दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांच्या मते तरुणांमध्ये सोडा आणि शीतपेयांच्या वाढत्या व्यसनाचे घातक परिणाम होऊ शकतात. साखरयुक्त पेये घेण्याऐवजी, आरोग्यदायी पर्याय म्हणून पाणी किंवा स्मूदी पिण्याची शिफारस केली जाते. तुमच्या कॅलरीजपैकी फक्त 10 टक्के कॅलरीज साखरेपासून मिळायला हवी. परंतु, सोडाच्या एका कॅनमध्ये 12 चमचे साखर असते. हे प्रमाण शिफारस केलेल्या दैनंदिन मर्यादेपेक्षा खूपचं जास्त आहे. त्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.