Double Masking करताना नेमके कोणते दोन मास्क एकत्र घालावेत? पहा केंद्र सरकारने दिलेला सल्ला

पहिला सर्जिकल मास्क आणि नंतर त्यावर कापडाचा मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Double Mask| Photo Credits: pexels.com

भारतामध्ये कोरोना वायरसच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेमध्ये आता डबल म्युटंट (Double Mutant)  वायरस मुळे रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली आहे. अशामध्ये एकीकडे या कोविड 19 (Covid 19) चा सामना करण्यासाठी लसीकरण वेगवान करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत तर दुसरीकडे डबल मास्क (Double Mask) वापरण्याचे देखील आवाहन आरोग्य यंत्रणा आणि पालिकेकडून केले जात आहे. कोरोनाचे एकापेक्षा अधिक प्रकार सध्या देशात असल्याने तुम्ही या कोरोना वायरसच्या म्युटंटपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरणानंतरही मास्क लावणं गरजेचे आहे. हा मास्क योग्य पद्धतीने लावलेला असेल तर नक्कीच तुम्हांला कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी मदत मिळू शकते. (नक्की वाचा:Double Masking: कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी डबल मास्किंग खरंच फायदेशीर आहे? पहा हे कुणी, कधी, कसं करावं?)

डबल मास्क वापरताना काय कराल काय टाळाल? 

कापडी मास्क खाली सर्जिकल मास्क घालण्याआधी हे नक्की पहा

कापडी मास्क खाली सर्जिकल मास्क घालण्याआधी त्याच्या दोन्ही बाजूला इलॅस्टिकला गाठी मारून घ्या म्हणजे रिकाम्या जागेतून हवा आणि त्यातून संसर्ग शरीरात जाण्याचा देखील धोका कमी होणार आहे.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेसह देशभर प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी फिरताना नागरिकांनी डबल मास्क घालण्याची विनंती केली आहे. सध्या सार्‍यांचं लसीकरण होईपर्यंत आपल्याकडे मास्क हेच कोरोनारूपी शत्रूचा सामना करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डबल म्यूटंट वायरस हा अधिक वेगाने पसरत असल्याने आता घरात देखील नागरिकांनी मास्क वापरण्याची वेळ आली आहे असे नीती आयोगाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे.