जिमला जाण्यापूर्वी या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष नाहीतर शरीरावर होऊ शकतो विपरित परिणाम

यासाठी तुम्हाला गरज आहे ती .योग्य सल्ल्याची

Gym Workout (Photo Credits: Instagram)

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वत:कडे, स्वत:च्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाहीय. त्यात घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या माणसाला वेळी-अवेळी खाणे, जंकफूड खाणे, अति प्रमाणात शीतपेय पिणे यांसारख्या गोष्टींचीही सवय लागून जाते. जणून तो त्याच्या लाईफस्टाईलचा एक भागच बनतो. यामुळे वजन वाढण्यासोबत शरीरासंबंधीच्या अनेक तक्रारी सुरु होतात. अशा वेळी आपली पावले वळतात ती जिम (Gym) कडे.

तसेच सध्याचा युवा वर्ग हा खूपच फिटनेस फ्रिक झाल्यामुळे जिमला जाण्यावर आणि वर्कआऊट करण्यावर तो विशेष भर देतो. मात्र जिमला जाण्यापूर्वी काय गोष्टी कराव्या अथवा करु नये याबाबत त्यांना पुरेशी माहिती नसल्याने त्याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होतो. यासाठी तुम्हाला गरज आहे ती योग्य सल्ल्याची. म्हणूनच या विषयावर आम्ही बातचीत केली 'हेलेकर्स फिटनेस' जिमच्या सर्वेसर्वा आणि अनुभवी पिलाटेस कोच (Balanced Body Pilates Coach) प्राची हेलेकर यांच्याशी.

जिमला जाण्यापूर्वी काय गोष्टी कराव्यात:

1. जिमला जाण्याच्या साधारण तासभर आधी एखादे इलायची केळे खाऊ शकता. त्याशिवाय पीनट बटर (Peanut Butter) ही खाऊ शकता. पण त्यातही सर्वांकडे पीनच बटर असेलच असं नाही. अशा वेळी तुम्ही एखादं इलायची केळं, शेंगदाणे खाऊ शकता.

2. तसेच तुम्ही उपाशीपोटीही वर्कआऊट करण्यासाठी जाऊ शकता. मात्र ते प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते. कारण वर्कआऊट करताना आपली खूप एनर्जी जाते, ज्यामुळे तुम्ही थकता. अशा वेळी तुमचे जे शरीर त्या गोष्टी पचण्यास सक्षम नसेल तर तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

3. तुम्ही खजूरही (Dates)खाऊ शकता. हे पचायला हलके असताता, ज्याचा तुमच्या शरीरावर काहीही विपरित परिणाम होणार नाही.

4. जिमला जाण्यापूर्वी किंवा वर्कआऊट करताना तुम्ही तुमच्या शरीराला झेपेल तितके पाणी पिऊ शकता.

हेही वाचा- World Hypertension Day: फिट राहणे हाच आहे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा रामबाण उपाय

जिमला जाण्यापूर्वी काय करु नये:

जिमला जाण्यापूर्वी पचायला जड असतील असे पदार्थ खाऊ नयेत. तसे केल्यास शरीरातील एनर्जी पचनक्रियेसाठी वापरण्याऐवजी वर्कआऊटमध्ये जाते. ज्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.

थोडक्यात जिमला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शरीराला शक्य तेवढे कमी खाऊन गेले तर तुमचे वर्कआऊटही मनासारखे होईल. अनेक लोकांच्या अशा तक्रारी असतात की, जिम ला जाऊनही आपण बारीक झालेलो नाही. त्याचे मूळ कारण हे जिम ला जाण्यापूर्वी (Pre-Workout)तुम्ही काय खाता यावर अवलंबून असते, असेही पिलाटे प्रशिक्षक प्राची हेलेकर यांचे म्हणणे आहे. नाहीतर वर्कआऊटला जाण्यापूर्वी भरपेट खाऊन गेल्यास तुमच्या कॅलरीज कमी होण्यापेक्षा वाढतील. त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी स्वत:च्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्या असा सल्ला प्राची हेलेकर यांनी दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif