'ब्रॉकली' खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

ब्रॉकली ही अगदी फ्लॉवरसारखी दिसणारी भाजी आहे. परंतु, या दोन्ही भाज्यांची चव वेगळी असते. या भाजीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. फ्लॉवरपेक्षा ब्रॉकलीमध्ये जास्त पोषणद्रव्य असतात. ब्रॉकलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच यात फ्लॉवरपेक्षा कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम, फॉस्फरस घटक अधिक असतात.

Broccoli Health Benefits (PC - Pixabay)

Health Benefits Of Broccoli: भारतीय बाजारपेठेत सहजासहजी मिळणारी ब्रॉकली (Broccoli) ही भाजी खाल्ल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ब्रॉकली ही अगदी फ्लॉवरसारखी दिसणारी भाजी आहे. परंतु, या दोन्ही भाज्यांची चव वेगळी असते. या भाजीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. फ्लॉवरपेक्षा ब्रॉकलीमध्ये जास्त पोषणद्रव्य असतात. ब्रॉकलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के घटक असतात. तसेच यात फ्लॉवरपेक्षा कॅल्शियम, आयर्न, मॅग्नॅशियम, फॉस्फरस घटक अधिक असतात.

ब्रॉकलीमध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. फ्लॉवर आणि ब्रॉकलीमध्ये पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हृद्यविकाराच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर ठरतात. ब्रॉकलीचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्रॉकली खाल्याने आपली प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. आज या लेखातून आपण ब्रॉकली खाण्याचे फायदे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Winter Health Tips: थंडीत संत्री खाण्याचे '5' गुणकारी फायदे)

ब्रॉकली खाण्याचे आरोग्यदायी फायदे - 

ब्रोकलीमध्ये क्रोमियम आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या आहारात ब्रोकलीचे सेवन केल्याने उच्चदाबासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. ब्रोकलीचे सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. ब्रोकली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका टाळला जाऊ शकतो.