उपाशी पोटी कधीच खाऊ नका 'या' गोष्टी, आरोग्यावर परिणाम होईल

तर नाश्तामध्ये केळ, संत्र आणि दही असे आरोग्यदायी पदार्थ असल्यास आपण नेहमीच तंदुरुस्त राहू असे वाटते.

Photo Credit: Facebook

प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यावर आपल्या समोर चहा ठेवली असल्यास आपले मन प्रसन्न होते. तर नाश्तामध्ये केळ, संत्र आणि दही असे आरोग्यदायी पदार्थ असल्यास आपण नेहमीच तंदुरुस्त राहू असे वाटते. मात्र जर तुम्ही असा विचार करत असल्यास सावधान. कारण गॅस, अॅसिडिटी आणि पोटासंबंधित आजार तुम्ही जर उपाशी पोटी असाल तर होऊ शकतात. त्यामुळे वेळीच सावध होत उपाशी पोटी खाण्याचे टाळा. नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजाराला बळी पडण्याची वेळ येऊ शकते.

जर तुम्हाला बेड टी किंवा कॉफी पिण्याची सवय असल्यास ती तुम्ही आजच बदला. कारण चहा आणि कॉफीमुळे बहुतांश प्रमाणात आरोग्याचे नुकसान होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होण्यासोबत हायड्रोक्लोरिक अॅसिड सुद्धा निर्माण होते. जे पाचनक्रिया होण्यासाठी अडथळा आणू शकते. तसेच उपाशी पोटी दही किंवा फर्मेंटेंड दुधासंबंधित या गोष्टी खाण्याचे टाळा. कारण हे पदार्थ खाल्ल्याने पोटातील उत्तम बॅक्टेरिया मारतात.(थंडीच्या दिवसात भरपूर गाजर खा, आरोग्यासह सौंदर्यासाठी सुद्धा ठरेल फायेशीर)

 सकाळी उठल्यावर थंड पेये पिण्याचे टाळा. कारण यामुळे खोकल्याची समस्या उद्भवू शकते. आपण बहुधा ऐकतो की केळ सकाळच्या नाश्तामध्ये केळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र उपाशी पोटी केळ खाण्याची सवय चुकीची आहे. केळ्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असून रक्ताचा स्तर वाढवतो. ते हृदयाच्या प्रक्रियेसाठी योग्य नसल्याचे सांगितले जाते. त्याचसोबत आंबट फळ खाणे योग्य नसून त्यामध्ये असलेले फॅक्ट्रोज आणि फायबर पोटासाठी अयोग्य ठरतात. एवढेच नाही तर मसालेदार पदार्थ सुद्धा सकाळी सकाळी खाऊ नये. त्यामुळे नेहमीच उपाशी पोटी वरील पदार्थ किंवा गोष्टी खाणे टाळा.