Diabetes Before 40: तारुण्यात होणारा 'टाईप 2 मधुमेह', आढळणारी कारणे, लक्षणे त्यावरील प्रतिबंध; जाणून घ्या महत्त्वाच्या टीप्स
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मधुमेहासारखा (Diabetes) असाध्य अजार जडला तर पुढील आयुष्यावरच गंभीर आव्हान निर्माण होऊ शकते. तरुणाईत आढळणारा टाईप 2 मधूमेह आणि वृद्धापकाळात आढळणारा टाईप टू मधुमेह या दोन्हींची चिन्हे आणि लक्षणे सारखीच असतात. मधूमेह आजार तरुणाईमध्ये वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष कले जाते. हे दुर्लक्ष करण्याचेही कारण आहे.
तरुणांमध्ये आढळून येणारे मधुमेहाचे (Diabetes Before 40) प्रमाण हा जगभरात चिंतेचा विषय आहे. जगभरातील आकडेवारी पाहिली तर टाईप 2 मधुमेह ( Type 2 Diabetes) झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मधुमेहासारखा (Diabetes) असाध्य अजार जडला तर पुढील आयुष्यावरच गंभीर आव्हान निर्माण होऊ शकते. मधुमेह UK या ब्रिटिश धर्मादाय संस्थेने दिलेल्या आकडेवारनुसार युनायटेड किंगडममध्ये मधुमेहाचे निदान झालेल्या 40 वर्षाखालील लोकांची संख्या 2016-17 मध्ये सुमारे 120,000 वरून 23% वाढून 2020-21 मध्ये 148,000 वर पोहोचली आहे. जगभरातही कमीअधिक फरकाने तरुणाईमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. जाणून घ्या मधुमेह आजाराची लक्षणे (Diabetes Symptoms), कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय.
किशोरवयीनांमध्येही मधुमेहाचे वाढते प्रमाण
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला वयाच्या 40 वर्षांच्या आगोदर मधुमेहाची लागण झाली तर त्याला टाईप 2 मधूमेह (Type 2 Diabetes) म्हणून ओळखले जाते. मधुमेह UK च्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हा आजार सामान्यतः मध्यम वयात किंवा वृद्धापकाळात आढळतो. मात्र अलिकडील काळात हा आजार पौगंडावस्थेतील मुले 20 किंवा 30 वयोगटातील लोकांमध्ये वाढत आहे. जो काही दशकांपूर्वी नव्हता.
तरुणांमध्ये मधुमेहाची चिन्हे आणि लक्षणे
- तरुणाईत आढळणारा टाईप 2 मधूमेह आणि वृद्धापकाळात आढळणारा टाईप टू मधुमेह या दोन्हींची
- चिन्हे आणि लक्षणे सारखीच असतात.
- अनेकांच्या बाबतीत नेहमीपेक्षा अधिक ताहान लागणे.
- सातत्याने लघवी होणे. वारंवार थकवा येणे.
- शरीरावर काही कारणाने झालेल्या जखमा लवकर न भरणे.
- हात-पाय सून्न पडणे. संवेदना कमी होणे. दृष्टीस अडथळा जाणवने अशीही काही लक्षणे जाणवू शकतात. अशी लक्षणे जाणविल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने आरोग्यतपासणी करणे आवश्यक असते.
वयाच्या चाळीशीपूर्वी लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते कारण?
लहान वयात मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा हा चुकीचा आहार, अस्वास्थ्यकरकपणे खाण्याच्या सवयी, विशेषत: जंक फूड, जास्त कॅलरीज, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा मोठा अभाव यामुळे होतो. तणाव हे देखील कमी वयात मधुमेह होण्याचे आणखी एक कारण असू शकते. सामान्यतः टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये अशी कारणे आढळू शकतात.
आनुवंशिकता
कधी कधी अनुवंशिकता हे देखील टाईप टू मधुमेहाचे कारण ठरते. पीडिमध्ये आगोदर कोणाला मधुमेहाचा आजार असेल तर तो पुढच्या पिढीतही दाखल होण्याची शक्यता असते. त्याला कौटुंबीक इतिहास, पार्श्वभूमी किंवा अनुवंशिकता म्हणतात. प्रामुख्याने आई किंवा वडील यांपैकी कोणाला हा अजार असेल तर तो मुलांमध्ये आढळण्याची शक्यता असते.
आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष आजार बळावण्याचे मुख्य कारण
मधूमेह आजार तरुणाईमध्ये वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष कले जाते. हे दुर्लक्ष करण्याचेही कारण आहे. ते म्हणजे इतक्या तरुण वयात आपणासही मधुमेह होऊ शकतो, याचा यत्किंचीतही विचार केला जात नाही. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी उपचारास उशीर होतो. शिवाय, खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा आणि बैठी जीवनशैली हे सर्व घटक या वाढीस कारणीभूत आहेत. त्यामुळे लक्षणे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय तपासणी करुन उपचार घेणे हा एक या आजारावरील महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)