Covid Test at Home: घरीच कोविड19 च्या चाचणीसाठी टेस्ट किटचा कसा वापर कराल? जाणून घ्या येथे अधिक

अशातच तुम्ही घरबसल्या फक्त 250 रुपयांत अवघ्या 15 मिनिटांत कोरोनाची चाचणी करु शकता.

COID19 Test Kit (Photo Credits-Twitter)

Covid Test at Home:  भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याने रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. अशातच तुम्ही घरबसल्या फक्त 250 रुपयांत अवघ्या 15 मिनिटांत कोरोनाची चाचणी करु शकता. यासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी कोरोनाच्या चाचणीसाठी रॅपिड अँटिजेनसाठी मंजूरी दिली होती. लक्षण दिसून आल्यानंतर तुम्ही घरीच कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासून पाहू शकता. परंतु हे किट कोरोनाचा नवा वेरियंटबद्दल तपासणी करु शकते की नाही यावर अद्याप अधिक अभ्यास केला जात आहे. अशातच आम्ही तुम्हाला होम टेस्टिंगच्या योग्य पद्धतीबद्दल अधिक माहिती देणार आहोत.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्का आलेल्यांसाठी रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे घरीच कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीएमआरद्वारे जाहीर करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार जर गंभीर लक्षणे दिसून आल्यानंतर ही रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्यास तर तुम्हाला सेंटरमध्ये जाऊन कोरोनाची पुन्हा एकदा चाचणी करावी लागणार आहे.(COVID 19 Precautionary Dose Online Appointments: 'बुस्टर डोस' साठी ऑनलाईन अपॉईंटमेंट; पहा कसा, कधी, कोणाला मिळणार डोस)

-कोविड19 किटचा वापर करताना सर्वात प्रथम एका स्वच्छ ठिकाणी बसा

-हात साबणाने धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर आता ग्लोव्स घाला

-आता किटचे पाउच उघडा आणि त्यामधील वस्तू एका टेबलावर ठेवा

-लक्षात ठेवा की, टेस्टिंग किटचा वापर करण्यापूर्वी त्यावर दिलेला अॅप My Lab Coviself डाउनलोड करुन तेथे सर्व माहिती द्यावी लागेल

-किटच्या आतमध्ये असलेली एक एक्सट्रेक्शन ट्युब घ्या

-याच्या आतमध्ये असलेले लिक्विड खाली बसेल यासाठी टेबलावर ठेवून खालच्या बाजूला दाबा

-आता कॅप उघडा आणि ट्यूब हातात घ्या

-ट्यूब हातात घेतल्यानंतर स्टेराइल नेजल स्वॅब उघडा, आपल्या नाकात एकापाठोपाठ एक 3-4 सेमी पर्यंत नेजल स्वॅब टाकून 5 वेळा फिरवा

-आता स्वॅब एक्सट्रॅक्शन ट्यूबमध्ये टाकून 10 वेळा फिरवा. लक्षात असू द्या की, या दरम्यान स्वॅब हा लिक्विडमध्ये डुबला गेला पाहिजे

-ब्रेकबद्दल जाणून घ्या आणि स्वॅब तोडून टाका. अखेर ट्यूब ही नोजल कॅपच्या सहाय्याने सील करा

-टेस्ट कार्डवर ट्यूब दाबत त्यावर दोन-तीन थेंब टाकून जवळजवळ 15-20 मिनिट वाट पहा

आयसीएमद्वारे अॅपवर 15 मिनिटांचा अलार्म सेट करण्यात आला आहे. अलार्म वाजल्यानंतर तुम्ही तुमचा रिपोर्ट पाहू शकता. जर टेस्ट कार्डवर C आणि T या दोन्ही रेषा येत असतील तर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आहे. तसेच फक्त सी रेष आल्यास तुमची चाचणी निगेटिव्ह आणि टी रेष दाखवल्यास किंवा कोणतीही रेष न दाखवल्यास तुम्ही योग्य पद्धतीने चाचणी केली नाही असे कळेल. त्याचसोबत रिपोर्ट आल्यानंतर टेस्ट कार्डचा फोटो काढून तो अॅपवर अपलोड करावा लागणार आहे.