गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी COVID-19 Vaccine सुरक्षित; दुधात लसीचा अंश आढळत नसल्याचे अभ्यासातून समोर
यामुळे गर्भवती आणि स्तनदा मातांनी लस घेतल्यास ती लस त्यांच्या बाळापर्यंत पोहचत नाही, हे सिद्ध होते.
कोविड-19 विरुद्ध दिली जाणारी लस ही स्तनदा मातेच्या दुधामध्ये आढळून येत नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे गर्भवती आणि स्तनदा मातांनी लस घेतल्यास ती लस त्यांच्या बाळापर्यंत पोहचत नाही, हे सिद्ध होते. हा अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्को च्या संशोधकांकडून करण्यात आला आहे. एमआरएनए व्हॅसिन, फायझर आणि मॉडर्ना लसी घेतलेल्या 7 वेगवेगळ्या महिलांचे दूध या अभ्यासासाठी तपासण्यात आले होते. त्यापैकी कोणत्याही महिलेच्या दुधामध्ये लसीचा स्ट्रेस आढळला नाही.
बाळाला दूध पाजताना जरी लस घेतली तरी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे JAMA Pediatrics मध्ये दिलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे स्तनदा मातेवर लसीचा परिणाम होतो, असा समज असलेल्यांसाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने स्तनदा मातांना लस घेण्यास सांगितले आहे. तर अॅकेडमी ऑफ ब्रेस्टफिडिंग मेडिसिननुसार लस घेतलेल्या मातांच्या ब्रेस्ट टीश्यूमध्ये लसीचे नॅनो पॅरटीक्लस जावून नवजात शिशूच्या रोगप्रतिकारक शक्तीला धोका निर्माण होऊ शकतो.
या अभ्यासामुळे एमआरएनए लस स्तनदा मातांसाठी अतिशय सुखरुप असून स्तनदा मातांनी ही लस जरुर घ्यावी आणि लस घेतल्यानंतर ब्रेस्टफिडिंग थांबवू नये, असे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्कोचे असिस्टंट प्रोफेसर Stephanie L. Gaw यांनी सांगितले. (Covid-19 Vaccine for Pregnant Woman: कोविड-19 लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित- ICMR)
"आम्ही घेतलेल्या दुधाच्या सॅपलमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या लसीचा स्ट्रेस मिळाला नाही," अशी माहिती UCSF चे Postdoctoral Yarden Golan यांनी सांगितले. हा अभ्यास डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान घेण्यात आला होता. या अभ्यासामध्ये सॅपल घेतलेल्या महिलांचे सरासरी वय 37.8 वर्ष होते आणि त्यांच्या बाळांचे वय 1 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत होते. लसीकरणाच्या आधी आणि लसीकरणानंतर वेगवेगळ्या कालावधीमध्ये दुधाचे सॅपल्स घेण्यात आले होते. यानुसार, लसींचा स्ट्रेस स्तनदा मातांच्या दुधात येत नसल्याचे समोर आले आहे.