Covid-19 Vaccine: काय सांगता? पठ्ठ्याने तब्बल 200 वेळा घेतली कोरोनाची लस; शास्त्रज्ञांनाही बसला धक्का, संशोधन सुरु

ते शरीरात एका प्रकारचे सैनिक म्हणून काम करतात आणि व्हायरसशी लढतात.

Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

Man Vaccinated Over 200 Times Against Covid-19: कोरोना महामारीच्या काही काळानंतर, कोविड विषाणूपासून संरक्षण करणारी लस (Covid-19 Vaccine) बाजारात आली. जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कोविड लस पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. या लसीचे काहींनी दोन तर काहींनी तीन डोस घेतले होते, मात्र आता एका जर्मन व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने कोरोना लसीचे तब्बल 200 हून अधिक डोस घेतले आहेत. ही व्यक्ती वैज्ञानिकांसाठी संशोधनाचा विषय बनली आहे. शास्त्रज्ञ या व्यक्तीची प्रतिकारशक्ती तपासत आहेत. या लसी व्यक्तीमध्ये अँटीबॉडीज तयार करत असून, त्याचे विषाणूपासून संरक्षण करत असल्याचे तपासात समोर आले आहे. लसीचा व्यक्तीवर होणाऱ्या परिणामाबाबत लॅन्सेट संसर्गजन्य रोग जर्नलमध्ये संशोधनही प्रसिद्ध झाले आहे.

Friedrich-Alexander-Universität Erlangen-Nürnberg आणि व्हिएन्ना येथील हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना स्थानिक बातम्यांमधून या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या जर्मन व्यक्तीशी संपर्क साधला आणि त्याला चाचणीसाठी बोलावले. ही व्यक्ती चाचणी आणि स्वतःवर संशोधन करून देण्यास तयार झाला.

इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी-क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, इम्युनोलॉजी अँड हायजीनचे संचालक प्रोफेसर डॉ. ख्रिश्चन बोगदान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या व्यक्तीच्या केसबद्दल वृत्तपत्रातील लेखांद्वारे कळले. या व्यक्तीला विविध पद्धतींवर चाचण्या आणि संशोधन करण्यासाठी एर्लांगेनला बोलावण्यात आले. इतक्या लसी घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती कशी काम करते हे पाहण्यासाठी या व्यक्तीवर संशोधन करण्यात आले.

म्युनिक आणि व्हिएन्ना येथील संशोधकांचाही समावेश असलेल्या सध्याच्या अभ्यासानुसार, या व्यक्तीने 200 पेक्षा जास्त वेळा लसी घेतल्याचे कोणतेही ठोस संकेत मिळाले नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, आतापर्यंतच्या संशोधनात हे सिद्ध झालेले नाही की त्या व्यक्तीने 200 पेक्षा जास्त लसी घेतल्या आहेत, मात्र त्याने इतरांपेक्षा खूप जास्त लस घेतल्या असल्याचे दिसून आले. या व्यक्तीच्या गेल्या काही वर्षांत अनेक चाचण्या झाल्या आहेत. या चाचणीचे नमुने गोठवण्यात आले आणि त्यांची तपासणी करण्यात आली. (हेही वाचा: Cataract Surgery Campaign: सर्वसामान्यांना दिलासा! राज्यातील विशेष मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ, जाणून घ्या सविस्तर)

या संशोधनाच्या परिणामांवरून असे दिसून आले की, या व्यक्तीमध्ये कोविड विरूद्ध टी-सेल्स मोठ्या प्रमाणात आहेत. ते शरीरात एका प्रकारचे सैनिक म्हणून काम करतात आणि व्हायरसशी लढतात. या व्यक्तीची तुलना दुसऱ्या गटातील लोकांशी देखील केली गेली ज्यांनी तीन लसी घेतल्या होत्या. मात्र शास्त्रज्ञांनी सांगितले की, या व्यक्तीमधील रोगप्रतिकारक प्रतिक्रिया तीन डोस घेतलेल्या लोकांसारखीच होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif