Covid-19: 'कोविड-19 विषाणू फुफ्फुसात 2 वर्षांपर्यंत राहू शकतो'; अभ्यासात झाला खुलासा

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर कोरोनाची प्रकरणे बर्‍यापैकी नियंत्रित होती, मात्र अलीकडील अहवालांमध्ये सिंगापूरमधील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने या आठवड्यात सर्वांना सतर्क केले की कोविड -19 संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

संपूर्ण जगभरात 2021 मध्ये कोविड-19 (Covid-19) ने खळबळ माजवली होती. या विषाणूमुळे लाखो लोकांचे मृत्यू झाले आहेत. आता कुठे जग या महामारीमधून सावरत आहे, इतक्यात कोरोना विषाणूसंदर्भात एक चिंताजनक बाब समोर आली आहे. एका अभ्यासातून समोर आले आहे की, कोविड-19 ला कारणीभूत ठरणारा SARS-CoV-2 हा विषाणू संसर्ग झाल्यानंतर लोकांच्या फुफ्फुसात 18 महिन्यांपर्यंत राहू शकतो. नेचर इम्युनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविड विषाणूचे इतक्या जास्त काळासाठी शरीरात टिकून राहणे हे जन्मजात प्रतिकारशक्तीच्या अपयशाशी जोडलेले आहे.

कोविडची लागण झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांनंतर, SARS CoV-2 विषाणू वरच्या श्वसनमार्गामध्ये आढळून येत नाही. मात्र संसर्ग झाल्यानंतर काही विषाणू शरीरात अज्ञातपणे वास्तव्य करतात. एचआयव्हीची (HIV) हीच स्थिती आहे, ज्यामध्ये विशिष्ट रोगप्रतिकारक पेशींमध्ये विषाणू राहतो आणि कधीही सक्रिय होऊ शकते.

SARS CoV2 विषाणूच्या चिकाटीचा अभ्यास करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या मॉडेलमधील जैविक नमुन्यांचे विश्लेषण केले आहे. ज्यामध्ये त्यांना आढळले की, फुफ्फुसांमध्ये टिकून राहणाऱ्या विषाणूचे प्रमाण मूळ SARS CoV 2 स्ट्रेनच्या तुलनेत ओमिक्रॉन स्ट्रेनसाठी कमी होते. इन्स्टिट्यूट पाश्चरच्या एचआयव्ही, इन्फ्लेमेशन आणि पर्सिस्टन्स युनिटचे संशोधक निकोलस हुट म्हणाले, 'एवढ्या दीर्घ कालावधीनंतर आणि नियमित पीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्यावर काही रोगप्रतिकारक पेशींमध्ये, अल्व्होलर मॅक्रोफेजमध्ये विषाणू आढळून आल्याने आम्हाला खरोखरच आश्चर्य वाटले.’ (हेही वाचा: Govt Advisory On Painkiller Meftal: पेनकिलर Meftal बाबत सरकारने जारी केला अलर्ट; 'Adverse Reaction' कडे लक्ष ठेवण्याचा सूचना)

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर कोरोनाची प्रकरणे बर्‍यापैकी नियंत्रित होती, मात्र अलीकडील अहवालांमध्ये सिंगापूरमधील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने या आठवड्यात सर्वांना सतर्क केले की कोविड -19 संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रेट्स टाईम्सने मंगळवारी दिलेल्या अहवालानुसार, श्वसन संक्रमणामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now