IPL Auction 2025 Live

मच्छर, डास चावल्याने कोरोना व्हायरस पसरतो का? जागतिक आरोग्य संघटनेने दिले 'हे' सोप्पे उत्तर

काही दिवसांपासुन एक नवा प्रश्न वारंवार समोर येत होता तो म्हणजे मच्छर किंंवा डास चावल्याने कोरोना पसरतो का? WHO च्या वैज्ञानिकांनी यासंदर्भात अत्यंत सोप्प्या स्पष्टीकरणासह उत्तर दिले आहे.

Mosquito Bite (Photo Credits: PixaBay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) चा उद्रेक सुरु होउन आता चार महिन्यांहुन अधिक काळ उलटला आहे, तरीही आतापर्यंत अनेकांना कोरोना पसरतो कसा याबाबत सवाल आहे. काही दिवसांपासुन एक नवा प्रश्न वारंवार समोर येत होता तो म्हणजे मच्छर (Mosquito)  किंंवा डास चावल्याने कोरोना पसरतो का?खरं पाहायला गेल्यास या प्रश्नाच्या मागील लॉजिक तसे योग्य आहे. समजा एखाद्या कोरोना रुग्णाला डास चावला असेल आणि तो अन्य कोणाला येउन चावला तर रक्ताच्या माध्यमातुन हा व्हायरस पसरु शकतो का असा संशय अनेकांना होता, मात्र आता WHO च्या वैज्ञानिकांनी यासंदर्भात अत्यंत सोप्प्या स्पष्टीकरणासह उत्तर दिले आहे. आनंदाची माहिती म्हणजे मच्छर किंवा डास चावल्याने कोरोना पसरत नाही असे अभ्यासकांनी सांगितले आहे.(Mouth Rash COVID 19 Symptom: तोंडात रॅश हे कोविड 19 चं संभाव्य लक्षण, अधिक अभ्यासाची गरज; स्पेन संशोधकांचा दावा)

अमेरिकेच्या कंसास स्टेट युनिव्हर्सिटी च्या स्टीफेन हिग्स यांनी लिहिलेल्या रिसर्च मध्ये असे सांगण्यात आले आहे की, आम्ही डास किंवा मच्छरच्या माध्यमातुन कोरोना पसरु शकतो का याचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकरणांंचा शोध घ्यायला सुरुवात केली,मात्र सुदैवाने असे प्रकरण आढळून आले नाही. तोंडाला चव नसणे म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह? जाणून घ्या PHFI चे डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांचा सल्ला

जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हा दावा केला आहे की डासांंच्या माध्यमातुन कोरोना पसरत नाही कारण कोरोनाचा व्हायरस जरी त्या डासाच्या शरीरात शिरला तरी तो टिकत नाही त्यामुळे असा डास चावल्यास ही चिंता करण्याचे कारण नाही.