Coronavirus: शास्त्रज्ञांनी शोधून काढले कोरोना विषाणूवरील औषध Molnupiravir; 24 तासांमध्ये बरा होणार रुग्ण- Study
एक वर्षापेक्षा अधिक काळापासून कोरोना विषाणूने थैमान घटले आहे. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणत्याही अचूक औषधाची निर्मिती झालेली नाही. जगभरात कोरोना लसी बनवण्यासाठी प्रयत्न होत असताना, शास्त्रज्ञांना एक औषध सापडले जे अवघ्या 24 तासात कोरोनावर उपचार करू शकेल.
एक वर्षापेक्षा अधिक काळापासून कोरोना विषाणूने थैमान घटले आहे. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणत्याही अचूक औषधाची निर्मिती झालेली नाही. जगभरात कोरोना लसी बनवण्यासाठी प्रयत्न होत असताना, शास्त्रज्ञांना एक औषध सापडले जे अवघ्या 24 तासात कोरोनावर उपचार करू शकेल. वैज्ञानिकांचा असा दावा आहे की हे अँटी-व्हायरल औषध पूर्णपणे कोरोना नष्ट करू शकते. या औषधाचे नाव MK-4482/EIDD-2801असे आहे, याला सोप्या भाषेत मोल्नुपीरावीर (Molnupiravir) असेही म्हणतात. जर्नल ऑफ नेचर मायक्रोबायोलॉजीमध्ये (Journal Nature Microbiology) प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, मोल्नुपीरावीर कोरोना रूग्णांना फक्त संसर्ग पसरण्यापासूनच रोखत नाही तर पुढील गंभीर आजारांना प्रतिबंधित करू शकते.
या अभ्यासाचे लेखक रिचर्ड प्लंपर (Richard Plemper) म्हणतात की, पहिल्यांदाच कोरोना ट्रीटमेंटसाठी तोंडावाटे घेतले जनंरे औषध प्रदर्शित केले जात आहे. MK-4482/EIDD-2801 कोरोनाच्या उपचारात गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. हे औषध जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या (Georgia State University) रिसर्च टीमने शोधले आहे. सुरुवातीच्या संशोधनात हे औषध इन्फ्लूएन्झासारखा घातक फ्लू दूर करण्यात प्रभावी असल्याचे आढळले, त्यानंतर फेरेट मॉडेलच्या माध्यमातून SARS-CoV-2 चा संसर्ग रोखण्यासाठी यावर संशोधन करण्यात आले. (हेही वाचा: UK नंतर Bahrain मध्ये मिळाली Pfizer-BioNTech लसीला मंजूरी; लवकरच लसीकरणाला सुरुवात)
हे संशोधन करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रथम काही प्राण्यांना कोरोना व्हायरसने संक्रमित केले. या प्राण्यांनी नाकातून विषाणू सोडण्यास सुरुवात करताच त्यांना MK-4482/EIDD-2801किंवा मोल्नुपीरावीर देण्यात आले. त्यानंतर या संक्रमित प्राण्यांना निरोगी प्राण्यांसोबत त्याच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. संशोधणाचे सह-लेखक जोसेफ वॉल्फ यांच्या मते, संक्रमित प्राण्यांसोबत ठेवलेल्या कोणत्याही निरोगी प्राण्यांमध्ये हा संसर्ग पसरला नाही. जर त्याच मार्गाने कोरोना संक्रमित रूग्णांवर मोल्नुपीरावीर औषधाचा वापर केला गेला तर 24 तासांच्या आत रुग्णांमधील संसर्ग संपुष्टात येईल.
MK-4482/EIDD-2801 ही कोरोनासंसर्गाविरूद्ध प्रगत टप्पा II/III च्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये असल्याचेही लेखकांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2020 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

