कोरोना विषाणू पुरुषांच्या सेक्स हॉर्मोन्स वर करतोय परिणाम; अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर 

ज्यानुसार कोरोनामधून पुरुषांना धोका जास्त असतो. कित्येक महिन्यांच्या काळानंतरही, ते संपूर्ण कोरोनाच्या पकडातून बाहेर पडण्यास सक्षम नाहीत.

Photo Credit: Pixabay

आपल्या सगळ्यांनाच आतापर्यंत कोरोनाच्या लक्षणाबद्दल माहीत आहे. सर्दी, तोंडाची चव जाणे, वास न येणे, उलट्या होणे अशा लक्षणांचा यात समावेश आहे.कोरोनाचे संकट वाढत असतानाच आता म्यूकोरमायकोसिस नावाच्या अजुन एका संसर्गजन्य रोगाने देशात प्रवेश केला. हा आजार कोरोनामधून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये आढळून येत आहे. या आजारामुळे अनेकांना त्यांचे प्राण आणि काहींना त्यांचे डोळे ही गमवावे लागले आहेत.मात्र आता एक नवी माहिती समोर येत आहे.नव्या अभ्यासात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्यानुसार कोरोनामधून पुरुषांना धोका जास्त असतो. कित्येक महिन्यांच्या काळानंतरही, ते संपूर्ण कोरोनाच्या पकडातून बाहेर पडण्यास सक्षम नाहीत. मियामी यूनिवर्सिटी (Miami University) ने केलेल्या या अभ्यासात असे समोर आले आहे की, बरे झाल्यानंतरही कोरोना विषाणू पुरुषांच्या त्यांच्या गुप्तांगात ( Penis ) मध्ये जाऊन घर करतो आहे. ज्यामुळे पुरुष इरेक्टाइल डिस्फंक्शन समस्या  अनुभवत आहेत, ज्यामुळे पुरुषांच्या सेक्स हॉर्मोन (Sex Hormones) टेस्टोस्टेरोन (testosterone) च्या स्तरात घट झाली आहे, ज्यामुळे पुरुषांमध्ये कामवासना (Loss of Libido) कमी होते. याचा वाईट परिणाम होत आहे.(HIV and Covid 19: एचआयव्ही रुग्णांना Coronavirus पासून अधिक धोका- सर्वे)

संशोधनात असेही आढळले आहे की हार्मोन्स च्या पातळीत असणा-या अडथळ्यांमुळे पुरुषांची रोगांविरूद्ध लढण्याची क्षमताही कमी होत आहे.मियामी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दोन पुरुष कोरोना रूग्णांचे लिंग स्कॅन केले. या व्यक्तींच्या पुनर्प्राप्तीनंतर 6 महिन्यांनंतर हे स्कॅनिंग केले गेले. कोरोना विषाणू त्यांच्या गुप्तांगात उपस्थित इरेक्टाइल पेशींच्या आत बसला असल्याचे तपासणीत समोर आले आहे. ज्यामुळे या पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा (Erectile Dysfunction) सामना करावा लागला आहे.मेर्सिन युनिव्हर्सिटीच्या (University of Mersin) युरोलॉजीचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक, सेलाहिटिन केयन(Selahittin Cayan) यांनी आधीच नोंदवले आहे की कमी टेस्टोस्टेरॉनची पातळी पुरुषांमधील रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता कमी करते. ज्यामुळे SARS-CoV-2 होऊ शकतो. परंतु कोविड -19 स्वतः टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करते असा दावा करणारा हा पहिला अभ्यास आहे. (Coronavirus उपचारादरम्यान Ivermectin औषधाच्या वापरावरुन WHO कडून पुन्हा एकदा गंभीर इशारा )

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या अभ्यासाच्या आधारे हे समजले जाऊ शकते की कोविड-19 च्या बाबतीत, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची रोगांशी लढण्याची क्षमता का कमी होत आहे. म्हणूनच, टेस्टोस्टेरॉनच्या उपचारांच्या आधारावर, वैद्यकीय क्षेत्रात संभाव्य सुधारांची अपेक्षा केली जाऊ शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की टेस्टोस्टेरॉन श्वसन अवयवांच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आहे, ज्यामुळे हार्मोनची पातळी कमी होण्यामुळे श्वसन संक्रमण होण्याचा धोका वाढतो.गंभीर कोविड -19 संक्रमित पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्सची पातळी कमी असल्याचे अभ्यासात आढळले आहे. कोरोना विषाणू रक्तवाहिन्यांचे नुकसान करीत आहे. त्याच वेळी तो शरीरात उपस्थित असलेल्या अवयवांचा नाश करीत आहे. जर पुरुषांचे रक्तस्त्राव थांबविला तर ते कधीही सेक्स करू शकणार नाहीत.अशी ही शंका दर्शवण्यात आलेली आहे.