Child’s Immunity: पालकांनो सावधान! तुमच्या मुलांच्या 'या' सवयींचा थेट त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो मोठा परिणाम

सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.

A child wearing a mask to get protected from coronavirus. (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’(Immunity) हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. परंतु, रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमजोर असलेल्या मुलांना अनेक आजार जडण्याची अधिक शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, अशा कोणत्या सवयीं आहेत, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते? याची योग्य माहिती असल्यास पालक आपल्या मुलांना त्यापासून चार हात लांब ठेवणे सोपे जाऊ शकते. यासाठी खालील माहिती अनेक पालकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

जागतिक आरोग्य संघटना अनुसार विकसित देशात लहान मुलांमध्ये अस्थमा या आजाराचे प्रमाण दुप्पट झाले आहे. खराब पोषण, प्रदुषण, असंतुलित जीवनशैली आणि ताणतणाव या कारणांमुळे लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर भरपूर परिणाम होतो. महत्वाचे म्हणजे, आजकालची मुले मैदानी खेळ न खेळता आपला अधिक वेळ मोबाईल किंवा कम्पुटरवर घालवताना दिसत आहेत. मैदानी खेळाने लहान मुलांना जीवनसत्व ड मिळते, जे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. शारीरिकरित्या सक्रिय न राहिल्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Testing: कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर

पालकांनी आपल्या मुलांना दिवसातील किमान 2 ते 3 तास किंवा सकाळ-संध्याकाळ मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे. पालकांनी त्यांना या खेळाच महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले पाहिजेत. ज्यामुळे ते तुम्ही ठरवलेले वेळापत्रक ते आनंदाने फॉलो करतील आणि नेहमी तणावमुक्त राहतील.