Chennai: कोरोना व्हायरस रुग्णावर झाली Lung Transplant शस्त्रक्रिया; आशियामधील पहिलाच प्रयोग असल्याचा MGM Healthcare चा दावा
चेन्नई (Chennai) येथील बहु-स्पेशलिटी हॉस्पिटल एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare) ने कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉझिटिव्ह रूग्णावर आशियातील प्रथम फुफ्फुस प्रत्यारोपण (Lung Transplant Surgery) केल्याचा दावा केला आहे.
चेन्नई (Chennai) येथील बहु-स्पेशलिटी हॉस्पिटल एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare) ने कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉझिटिव्ह रूग्णावर आशियातील प्रथम फुफ्फुस प्रत्यारोपण (Lung Transplant Surgery) केल्याचा दावा केला आहे. या फुफ्फुसांचा दाता हा 34 वर्षांचा मनुष्य होता. त्याला गुरुवारी इंट्रा-सेरेब्रल हेमोरेज (Intracerebral Hemorrhage) झाल्यानंतर अपोलो ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या व्यक्तीने आपले हृदय, यकृत आणि त्वचा दान रुग्णालयांमधील विविध प्राप्तकर्त्यांना दान करण्यास मान्य केले आहे.
सर्जरीनंतर डॉक्टर म्हणाले की, हा 48 वर्षीय गुरुग्राम येथील व्यवसायीक आता ठीक असून, त्याचे नवीन फुफ्फुस चांगले कार्यरत आहेत. एनजीटीव्हीशी बोलताना एमजीएम हेल्थकेअरचे हार्ट अँड फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष व संचालक डॉ. केआर बालाकृष्णन म्हणाले की, ‘8 जून रोजी रुग्ण कोरोना संक्रमित आढळला होता. त्याच्या फुफ्फुसांवर कोरोना व्हायरस संबंधित फायब्रोसिसमुळे वाईट परिणाम झाला होता. जुलैमध्ये, त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर चेन्नई येथे हलविण्यात आले आणि ईसीएमओ (ECMO) उपचार चालू केले. हे फुफ्फुसांचे ऑपरेशन करण्याआधी रुग्ण कोरोना व्हायरसने बरा झाला होता.’
एमजीएम हेल्थकेअरचे सह-संचालक डॉ. सुरेश राव यांनी सांगितले, ‘त्याचे दोन्ही फुफ्फुस आता चांगले काम करत आहेत आणि आम्ही ईसीएमओ सपोर्ट काढून टाकला आहे. या रुग्णांची क्लिनिकल प्रकृती स्थिर आहे.’ चेन्नईच्या ग्लेनॅग्लेस ग्लोबल हॉस्पिटलमधील ब्रेन डेड डोनरकडून प्रत्यारोपणाचे फुफ्फुस आले. त्याच रुग्णालयात दाताचे हृदय दुसर्या प्राप्तकर्त्यासही देण्यात आले. (हेही वाचा: मेघालय येथे एप्रिल-जुन महिन्यादरम्यान जवळजवळ 61 गर्भवती महिलांसह 877 नवजात बालकांचा मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती)
ग्लोबल हॉस्पिटल चेन्नईने या दाताचे यकृत, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि त्वचा शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दान केली. या व्यक्तीचे हात मुंबईच्या उपनगरी भागातील मोनिका मोरे या युवतीकडे गेले. ही युवती आतापर्यंत कृत्रिम हात वापरत होती आणि आता तिला खरे हात मिळाले. कोविड-19 पॉझिटिव्ह रूग्णांवर फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा हा आशियातील पहिलाच प्रयोग आहे आणि लॉकडाउन सुरू झाल्यापासूनची रुग्णालयातील ही दुसरी केस आहे.