IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay, भारतीय बनावटीचं Monkeypox निदानाचं स्वदेशी किटला CDSCO कडूनही मंजुरी

IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay हे molecular diagnostic testवर काम करतं. याच्या मदतीने clade I आणि clade II या दोन्ही वायरसच्या व्हेरिएंट्स तपासले जाऊ शकतात.

IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay | X @ANI

जगभरात सध्या Monkeypox या आजाराचे रूग्ण वाढत असल्याने भारतातही या आजाराला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर आली आहे. सध्या देशात मंकीपॉक्सचे रूग्ण नाहीत पण सरकार कडून प्रतिबंधक योजना सुरू करण्यात आल्या आहे. भारतामध्ये स्वदेशी बनावटीचं पहिलं आरटी पीसीआर किट तयार करण्यात आले आहे. यामुळे मंकिपॉक्सचे निदान होणार आहे. Siemens Healthineers ने बनवलेलं हे IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay आहे. त्याला Central Drugs Standard Control Organisation ने देखील मंजूरी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्समुळे Public Health Emergency घोषित केली आहे. Clad-1,हा वायरसचा नवा स्ट्रेन समोर आला आहे त्याच्यामुळे मृत्यूसंख्येत आणि संसर्ग होण्याच्या शक्यतेमध्ये वाढ होत आहे. नक्की वाचा: Mpox Vaccine in India: सीरम इन्स्टिट्यूट स्वदेशी अँटी-एमपॉक्स लस विकसित करण्याबाबत आशावादी; Adar Poonawalla यांची माहिती. 

IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay हे molecular diagnostic testवर काम करतं. याच्या मदतीने clade I आणि clade II या दोन्ही वायरसच्या व्हेरिएंट्स तपासले जाऊ शकतात.

Siemens Healthcare Private Ltd च्या माहितीनुसार, या टेस्ट द्वारा निदान 40 मिनिटांमध्ये होणार आहे. ICMR-National Institute of Virology पुणे द्वारे या कीटला क्लिनिकली हिरवा कंदील देण्यात आला आहे. IMDX Monkeypox RTPCR Assay kits हा Indian statutory guidelines आणि ग्लोबल स्टॅडर्सचा असल्याचेही Siemens ने म्हटलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now