Capsule to Help Treat Obesity: भूक शमन करणारी कॅप्सूल; जेवणाआधी 20 मिनिटे घ्या आणि लठ्ठपणावर मात करा, जाणून घ्या सविस्तर
त्यामुळे अन्न पोटात आल्याचा संदेश मेंदूला मिळतो आणि मग खाल्ल्याने समाधानाची भावना येऊ लागते. श्रीनिवासन यांच्या टीमने विकसित केलेले कॅप्सूल हेच काम करेल आणि न जेवता जेवणानंतरचे समाधान देईल.
Capsule to Help Treat Obesity: मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Massachusetts Institute of Technology) भारतीय वंशाच्या महिला अभियंत्याने लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी नवीन 'व्हायब्रेटिंग कॅप्सूल' (Vibrating Capsule) विकसित केले आहे. बरेचदा लोक गरज आणि प्रमाणापेक्षा जास्त खातात त्यामुळे शरीरात ज्यादा चरबी (Extra Fat) जमा होते. एखादा आवडता पदार्थ असला की, नक्कीच जास्तीचे खाणे होते. आता हे कॅप्सूल हीच गोष्ट बंद करणार आहे. ही गोळी मेंदूला कधी खाणे थांबवायचे याबाबत संकेत देऊ शकते. म्हणजेच ही गोळी आता खाणे थांबवण्याची वेळ आली आहे, ही गोष्ट मेंदूला सांगू शकते. त्यामुळे लठ्ठपणापासून आराम मिळू शकतो.
या भूक शमन गोळीची संकल्पना एमआयटी पदवीधर विद्यार्थिनी श्रिया श्रीनिवासन यांची आहे. गिळण्यायोग्य असलेली ही कॅप्सूल पोटात कंपन निर्माण करते. जे स्ट्रेच रिसेप्टर्स सक्रिय करते, जे पोटात वाढल्यावर परिपूर्णतेची भ्रामक भावना निर्माण होते. ट्रायलवेळी ही गोळी जनावरांना जेवणाआधी 20 मिनिटे दिली गेली. त्यावेळी संशोधकांना असे आढळून आले की, या उपचाराने केवळ तृप्तिचे संकेत देणारे हार्मोनच स्त्रवले नाहीत, तर प्राण्यांचे अन्न सेवन सुमारे 40 टक्के कमी झाले.
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे किंवा ज्यांना त्यांची भूक नियंत्रित करायची आहे, असे लोक ही गोळी प्रत्येक जेवणापूर्वी ते घेऊ शकतात, असे प्रमुख लेखिका श्रिया श्रीनिवासन यांनी सांगितले. अहवालात असे म्हटले आहे की, जेव्हा आपण पोटभर अन्न खातो तेव्हा पोट ताणले जाते. त्यामुळे अन्न पोटात आल्याचा संदेश मेंदूला मिळतो आणि मग खाल्ल्याने समाधानाची भावना येऊ लागते. श्रीनिवासन यांच्या टीमने विकसित केलेले कॅप्सूल हेच काम करेल आणि न जेवता जेवणानंतरचे समाधान देईल. (हेही वाचा: Cancer Deaths in India: भारतामध्ये एका वर्षात कर्करोगामुळे तब्बल 9.3 लाख मृत्यू, समोर आली 12 लाख नवीन प्रकरणे- Lancet Study)
ही गोळी पोटात जाईल आणि त्याच प्रकारे कंपन निर्माण करेल, जी कंपने जेवणानंतर होतात. त्यामुळे मेंदूला पोटात अन्न न जाता अन्न मिळाल्याचा संदेश प्राप्त होईल. अहवालानुसार ही गोळी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर औषध-उपचारापेक्षा थोडी स्वस्त असेल. जे लोक अधिक महागडे उपचार घेऊ शकत नाहीत, अशा लोकापर्यंत हो गोळी पोहोचवण्याचे ध्येय आहे.
(टीप: लेखात दिलेली माहिती इंटरनेट आधारित आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)