Cancer Treatment Tablet: दिलासादायक! टाटा इन्स्टिट्यूटचा कॅन्सरवर यशस्वी उपचाराचा दावा; अवघ्या 100 रुपयांत उपलब्ध होणार नवी गोळी, जाणून घ्या सविस्तर

गेल्या दशकापासून यावर संशोधन करत असताना त्यांना आढळले की, ही गोळी कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करते आणि त्यांचा नाश करते. ही टॅब्लेट रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते ज्यामुळे कर्करोगाशी लढण्यास मदत होते.

File Image

Cancer Treatment Tablet: कर्करोग (Cancer) हा इतका गंभीर आजार आहे की त्यावर उपचार करूनही तो पुन्हा रुग्णात पसरणार नाही याची शाश्वती नाही. बऱ्याच वेळा असे दिसून येते की, कर्करोग उपचारानंतरही अनेक रुग्णांमध्ये पुन्हा पसरतो. आता टाटा हॉस्पिटलच्या (Tata Institute) डॉक्टरांनी कर्करोगाच्या आजारावर सखोल अभ्यास केला आणि उपचारानंतरही कॅन्सर पुन्हा रुग्णांमध्ये का पसरतो हे जाणून घेतले. यानंतर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे जी कर्करोगावर उपचार करण्यासाठी आणि कर्करोग दुसऱ्यांदा होण्यापासून रोखण्यासाठी मदत करू शकते. या टॅब्लेटमुळे कर्करोगाचे दुष्परिणामही कमी होऊ शकतात.

ही गोळी टीआयएफआरच्या डॉक्टरांनी विकसित केली आहे. गेल्या दशकापासून यावर संशोधन करत असताना त्यांना आढळले की, ही गोळी कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करते आणि त्यांचा नाश करते. ही टॅब्लेट रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते ज्यामुळे कर्करोगाशी लढण्यास मदत होते. खारघरच्या कॅन्सर हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटलमधील ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशनचे डॉ. इंद्रनील मित्रा यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे.

हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. हे संशोधन करण्यासाठी, मानवी कर्करोगाच्या पेशी उंदरांमध्ये घातल्या गेल्या, त्यानंतर त्यांच्यामध्ये ट्यूमर तयार झाला. डॉ. इंद्रनील यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्यावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि सर्जरीद्वारे उपचार केले. जेव्हा कर्करोगाच्या पेशी मरतात, तेव्हा ते खूप लहान तुकड्यांमध्ये मोडतात, या तुकड्यांना क्रोमॅटिन कण म्हणतात. क्रोमॅटिनचे कण रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागात जाऊ शकतात. जेव्हा ते निरोगी पेशींमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते कर्करोगाच्या पेशींमध्ये बदलू शकतात. ज्यामुळे कर्करोग नष्ट होऊनही परत येऊ शकतो. (हेही वाचा: Indian Spices to Treat Cancer: आता भारतीय मसाल्यांचा वापर करून होणार कर्करोगावर उपचार; IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट)

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी डॉक्टरांनी उंदरांना रेझवेराट्रोल आणि कॉपरची एकत्रित प्रो-ऑक्सिडंट गोळी दिली. क्रोमॅटिन कणांचा प्रभाव रोखण्यासाठी ही गोळी फायदेशीर ठरली. टाटा डॉक्टर जवळपास दशकभर या टॅब्लेटवर काम करत होते आणि अखेर त्यांना यश मिळाले. सध्या, ही टॅबलेट FSSAI कडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. शास्त्रज्ञांनी FSSAI कडे या टॅब्लेटला मान्यता देण्यासाठी अर्ज केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हा टॅबलेट बाजारात उपलब्ध होईल. या टॅब्लेटमुळे कॅन्सरच्या उपचारात सुधारणा होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif