Bowel Disease: प्रतिजैविकांचा अतिवापर 40 वर्षांवरील लोकांसाठी ठरू शकतो आतड्यांच्या रोगासाठी निमंत्रण
जागतिक स्तरावर, जवळपास 7 दशलक्ष लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
प्रतिजैविकांचे अतीसेवन हे सर्वच वयोगटातील नागरिकांना त्रासदायक ठरु शकते. पण, जर्नल गट ( journal Gut) मध्ये प्रकाशित झालेल्या एका ऑनलाईन माहितीमध्ये म्हटले आहे की, प्रतिजैविक वापरामुळे 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दाहक आतड्याच्या (Bowel Disease आजाराचा (क्रोहन रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस) धोका वाढू शकतो. साधारण वापरानंतर 1-2 वर्षांनी प्रतिजैविकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या अधिक उठावदारपणे आणि एकत्र उद्भवतात.
अभ्यासकांनी केलेले संशोधन आणि सादर केलेले पुरावे, सूचित करतात की दाहक आंत्र रोग (IBD) च्या विकासामध्ये पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर, जवळपास 7 दशलक्ष लोकांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पुढील दशकात ही संख्या वाढण्याची भीती संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, तरुण लोकांमध्ये प्रामुख्याने दाहक आतडी रोग (IBD )शी संबंधित एक महत्त्वाचे कारण म्हणजे अँटिबायोटिक्सचा अती वापर. परंतु हे संबंध वृद्ध लोकांना देखील लागू होऊ शकते की नाही हे स्पष्ट झाले नाही. (हेही वाचा, Heart Attack In Winters: हृदयविकाराचा धोका हिवाळ्यात वाढतो? काय सांगतात हृदयविकाराचे तज्ज्ञ?)
संशोधकांनी काही विशिष्ट वयोगटातील समूहांची विभागणी केली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की प्रतिजैविकांची वेळ आणि डोस IBD च्या विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो का आणि IBD आणि प्रतिजैविक प्रकारानुसार बदलते किंवा नाही. अभ्यासात 6.1 दशलक्षाहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला होत्या. 2000 आणि 2018 दरम्यान एकूण 5.5 दशलक्ष (91%) प्रतिजैविकांचा किमान एक कोर्स लिहून दिला गेला. या कालावधीत, अल्सरेटिव्ह कोलायटिसची सुमारे 36,017 नवीन प्रकरणे आणि क्रोहन रोगाची 16,881 नवीन प्रकरणे आढळून आली.
एकंदरीत, कोणत्याही प्रतिजैविक वापराच्या तुलनेत या औषधांचा वापर वयाची पर्वा न करता केल्यास IBD विकसित होण्याच्या उच्च जोखमीशी संबंधित होता. पण अधिक वय हे सर्वाधिक जोखमीशी संबंधित होते. 10-40 वयोगटातील लोकांना IBD चे निदान होण्याची शक्यता 28% जास्त होती. 40- 60 वर्षांच्या नागरिकांमध्ये असे होण्याची शक्यता 48% अधिक होती, तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये असे होण्याची शक्यता 47% अधिक होती.
अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या तुलनेत क्रोहन रोगासाठी जोखीम किंचित जास्त होती. 10-40 वर्षांच्या मुलांमध्ये 40%; 40-60 वयोगटातील 62%; आणि 60 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये 51%. हे प्रमाण दिसून आले.