Bipolar Disorder: बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराची लक्षणं काय? रूग्ण यातून बरा होऊ शकतो का?

यामध्ये काही उपचार पद्धती आणि सेल्फ मॅनेजमेंट यांच्या माधयामातून स्टेबल मूड ठेवण्यासाठी मदत केली जाऊ शकते. तसेच त्यांचा काळ लांबवला जाऊ शकतो.

Bipolar Disorder | Image Used for Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com

बायपोलर हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये रूग्णाचा सतत मूड बदलत राहतो. अवघ्या काही काळात दोन टोकाच्या मूडमध्ये त्यांचा प्रवास सुरू असतो. ही स्थिती सामान्य नसते. या आजारातून जाणार्‍या व्यक्ती महिनोंमहिने नैराश्यामध्ये राहू शकतात किंवा फार मोठा काळ सतत चिंतेमध्ये किंवा मानसिक अस्वस्थाच्या सामना करत असतात. मॅनिक डिप्रेशन म्हणून ओळखला जाणार्‍या या आजारामध्ये रूग्णाचा मूड यासोबतच एनर्जी, कार्यक्षमता आणि एकाग्रता यामध्येही बदल होत असतात. बायपोलर हा एक पूर्णपणे मात करू शकू असा आजार नाही. यामध्ये काही उपचार पद्धती आणि सेल्फ मॅनेजमेंट यांच्या माधयामातून स्टेबल मूड ठेवण्यासाठी मदत केली जाऊ शकते. तसेच त्यांचा काळ लांबवला जाऊ शकतो.

सेलिब्रिटींच्या माध्यमातून आता मानसिक आरोग्य हा विषय देखील पुढे येत असल्याने त्याबाबत जनजागृतीला सुरूवात झाली आहे. मात्र बायपोलर सारख्या आजारांबद्दल अजूनही लोकांच्या मनात समज-गैर समज आहेत. भीती, अज्ञान आहे.

बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय?

नेहमीची काम करताना देखील सातत्याने मूड, कार्यक्षमता, एकाग्रता याच्यामध्ये होणार्‍या बदलातून होणारा बायपोलर हा मानसिक आजार आहे. या आजारातून जाणार्‍याच्या आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात. व्यक्ती सापेक्ष ते वेगवेगळे असू शकतात. Bipolar I Disorder, Bipolar II Disorder आणि Cyclothymic Disorder अशा विभागांमध्ये बायपोलर या आजाराची विभागणी केली जाते. या तिन्हींमध्ये रूग्णाच्या मूड, अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये बदल होत असतात.

बायपोलर डिसऑर्डरची लक्षणं काय?

The US National Institute of Mental Health च्या माहितीनुसार, सातत्याने मूडमध्ये बदल होऊन ते वर-खाली होणं, एनर्जी कमी जास्त होणं, झोपण्याच्या पॅटर्नमध्ये बदल होणं ही लक्षणं दिसायला लागतात. तसेच रिलेशनशीप, कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांसोबत वागणं यामध्ये अचानक नाट्यमयरित्या बदल होतात. सामान्य मूड स्विंगपेक्षा बायपोलर असणार्‍यांमधील मूड स्विंग हे अधिक गंभीर असू शकतात. यामध्ये ते स्वतःला इजा करून घेणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं अशा गोष्टी देखील करतात.

बायपोलर वर काही उपचार आहेत का?

बाय पोलर या आजारावर ठोस आणि पूर्ण आजार बरा होऊ शकेल असे उपचार नाही. मात्र वेळीच या आजाराचं निदान झाल्यास काही उपचार पद्धतीच्या मदतीने रूग्ण निरोगी आणि अ‍ॅक्टिव्ह जीवन जगू शकतो. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असल्याने आता त्याची लक्षणं, अनुभव कमी केला जाऊ शकतो.

मानसिक आरोग्याबद्दल समाजात अजूनही उघड बोललं जात नाही. त्यामुळे आजाराच्या निदानाअभावी, उपचाराअभावी अनेक जण आपल्या जीवनामध्ये टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवण्याचा विचार करतात. अनेकजण वर्षानुवर्ष नैराश्यासोबतच घलावतात.